Thursday, August 7, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरातील पंचगंगा नदीकाठावरील ३९ गावे लावतात प्रदुषणाला हातभार, प्रदूषणमुक्तीचे आदेश कागदावरच

कोल्हापुरातील पंचगंगा नदीकाठावरील ३९ गावे लावतात प्रदुषणाला हातभार, प्रदूषणमुक्तीचे आदेश कागदावरच

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर : पंचगंगा नदीचा उगम सह्याद्री पर्वतातच होतो. पंचगंगा नदीखोरे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्याचा आर्थिक कणा आहे. या खोऱ्यात कोल्हापूर, गांधीनगर, इचलकरंजी, हातकणंगले यासारखी नागरी आणि औद्योगिक केंद्रे येतात. तसेच या खोऱ्याच्या एकूण १२५ कि.मी लांबी मध्ये एकूण
१७४ गावेही येतात. या नदीकाठावरील ३९ गावे प्रदुषणाला हातभार लावतात. अनेक गावांत कावीळ, गॅस्ट्रोसारख्या जलजन्य साथीसोबतच मासे, कासवांसारखे जलचर मृत्यूमुखी पडले आहेत. इतकेच काय इचलकरंजीतील चाळीस व्यक्तींनाही जीवानिशी जावे लागले आहे.



विद्यापीठाचे सर्वेक्षण शिवाजी विद्यापीठाच्या पर्यावरणशास्त्र अधिविभागाने नदीकाठावरील १७४ गावांचे सर्वेक्षण करुन प्रदूषणाला हातभार लावणाऱ्या घटकांचे विश्लेषण केले. जलपर्णी वाढल्यामुळे पाणी दूषित झाले आहे. रासायनिक पाणी, मळीयुक्त सांडपाणी नदीत मिसळते. तसेच दुधाळी, जयंती, बापट कॅम्प, लाईन बाजारसह छोटे- मोठे नाले नदीत मिसळून प्रदुषणाची तीव्रता वाढवली आहे.

• पंचगंगा खोऱ्यातील गावे : १७४
• प्रदूषणास कारणीभूत ठरणारी गावे : ३९
• कायमस्वरूपी सांडपाणी मिसळणारी गावे : २१
• अंशत: सांडपाणी मिसळणारी गावे : १५
• हंगामी प्रदूषण करणारी गावे : १३५
बारमाही प्रदूषण करणारी गावे २१
करवीर : बालिंगे, गांधीनगर, हळदी, हणमंतवाडी, कांडगा कोपार्डे, कोथळी, कुडित्रे, नागदेववाडी, परिते, शिंगणापूर, उचगाव, वाकरे, वळीवडे, वरणगे
हातकणंगले : चंदूर, हातकणंगले, कबनूर, रुई, शिरोली, तिळवणी
शिरोळ : नांदणी, नृसिंहवाडी

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -