शेअर बाजार खुला होताच मागील दोन दिवसांमध्ये दिसलेल्या तेजीनंतर आज (15 डिसेंबर) मात्र बाजारात विक्रीचा जोर सकाळपासून वाढत आहे. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याजदरात वाढ केल्यानंतर भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली. सेन्सेक्समधील टॉप 30 कंपन्यांच्या शेअर्सपैकी आज फक्त 09 कंपन्यांचे शेअर्स वधारले असून 21 कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली आहे.
मुंबई शेअर बाजार खुला झाला तेव्हा सेन्सेक्स 74 अंकांच्या घसरणीसह 62,603 अंकांवर सुरू झाला आणि निफ्टी 18 अंकांच्या घसरणीसह 18,642 अंकांवर खुला झाला. तर आता (11 वाजता) सेन्सेक्स 301 अंकांनी घसरून 62,376.00 च्या पातळीवर व्यवहार करत आहे तर निफ्टी 85 अंकाने घसरून 18,576.00 च्या पातळीवर व्यवहार करत आहे. तुम्हीदेखील शेअर बाजारात गुंतवणूक करत असाल तर जोखीम, फायदा-नुकसान लक्षात घेऊनच व्यवहार करा.
आज कोणत्या शेअर्समध्ये वाढ?
▪️ बजाज फायनान्स
▪️ महिंद्रा अँड महिंद्रा
▪️ एल अँड टी
▪️ एचडीएफसी बँक
▪️ सन फार्मा
▪️ बजाज फिनसर्व्ह
▪️ इंडसइंड बँक
▪️ एसबीआय
▪️ एनटीपीसी
आज कोणते शेअर्स घसरले?
▪️ टाटा स्टील
▪️ एशियन पेंट
▪️ टायटन
▪️ नेस्ले इंडिया
▪️ मारुती
▪️ टेक महिंद्रा
▪️ एचसीएल टेक
▪️ हिंदुस्थान युनिलिव्हर
▪️ इन्फोसिस
▪️ टीसीएस
▪️ डॉ. रेड्डी (लॅब.)
▪️ ॲक्सिस बँक
▪️ एचडीएफसी
▪️ भारती एअरटेल
▪️ रिलायन्स
▪️आयटीसी
▪️ पॉवरग्रिड
▪️ विप्रो
▪️ कोटक बँक
▪️ आयसीआयसीआय बँक
▪️अल्ट्राटेक सिमेंट