Sunday, December 22, 2024
Homeसांगलीमहागडय़ा सायकली चोरणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या, सांगलीतील विश्रामबाग पोलिसांची कारवाई

महागडय़ा सायकली चोरणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या, सांगलीतील विश्रामबाग पोलिसांची कारवाई

सांगली शहरातील विविध परिसरातून महागडय़ा सायकल चोरणाऱया अट्टल चोरटय़ाच्या विश्रामबाग पोलिसांनी मुसक्या आवळल्या. गुन्हे प्रकटीकरण शाखेने कॉलेज कॉर्नर परिसरात सदरची कारवाई केली.त्याच्याकडून चोरीच्या 1 लाख 25 हजार रुपये किमतीच्या तब्बल 20 सायकली जप्त करण्यात आल्या आहेत.

वरुण रमेश पांढरे (वय 18, रा. अभयनगर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. सांगली शहरातील विशिष्ट प्रभागांमधून गेल्या काही दिवसांमध्ये महागडय़ा सायकल चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले होते. पार्ंकगमध्ये, कॉलेज परिसरात तसेच घरासमोर लावलेल्या सायकली चोरीला जात होत्या. या सायकलींची किंमत पाच हजार ते 20 हजार रुपयांपर्यंत असायची. 19 डिसेंबर रोजी विश्रामबाग परिसरातील क्रांती भेळ या दुकानाला लागून रंगराव पांढरे यांनी त्यांची सायकल लावली होती. ही सायकल चोरटय़ांनी लंपास केली. याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्यात नोंद झाली होती.

सायकल चोरटय़ांचा तपास करीत असताना एकजण कॉलेज कॉर्नर परिसरात चोरीची सायकल विकण्यासाठी येणार असल्याची माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी त्याठिकाणी सापळा लावून वरुण पांढरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता ही सायकल क्रांती भेळजवळून चोरल्याची कबुली दिली. त्याच्याकडे अधिक विचारपूस करता आणखीन सायकली घराजवळ असल्याचे सांगितले. यानंतर पोलिसांनी त्याच्या घराजवळ छापा टाकून 1 लाख 25 हजार रुपये किमतीच्या 20 सायकल जप्त केल्या.

पोलीस निरीक्षक कल्लाप्पा पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील, अनिल ऐनापुरे, संदीप घस्ते, आदिनाथ माने, विलास मुंढे, विक्रांत घेरडे, दरिबा बंडगर, महम्मद मुलाणी या पथकाने ही कारवाई केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -