Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापुरात वाढदिवशीच तरुणाचा हृदयद्रावक शेवट

कोल्हापुरात वाढदिवशीच तरुणाचा हृदयद्रावक शेवट

घरात वाढदिवसाची तयारी सुरू होती. मित्र-मैत्रिणींनी सोशल मीडियावर स्टेटस ठेवले होते.सर्व कस खुप चांगल घडत होते. मात्र अचानक अशी घटना घडली आणि एकच शोककळा पसरली. वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे स्टेटस अचानक काही तासातच श्रद्धांजलीत बदलले. या घटनेमुळे कोल्हापूरात हळहळ व्यक्त होत आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर प्रणव पाटीलने घरच्या जबाबदाऱ्यांच ओझ खांद्यावर घेत कुटूंबाला सांभळल. या दरम्यान त्याने स्वत:च शिक्षण पुर्ण केले. नंतर एका फायनान्स कंपनीत कामाला देखील लागला.

चंबुखडीत कुटूंबियांसाठी नवीन घर घेतले. स्वत:च लग्न देखील केले. अगदी सामान्य राहणाऱ्या प्रणवच्या आयुष्यात सर्व खुप चांगले चाललं होत. मात्र नियतीला काही मान्य नव्हत, आणि जे झालं ते कुटूंबियांचा आधारवड हरपून गेलं.

कोल्हापूरच्या प्रणव पाटीलने दीड वर्षापुर्वीच चंबुखडीत नवीन घर घेतले होते. या नवीन घरात वाढदिवस साजरा करण्याचा बेत त्याने आखला होता. या वाढदिवसासाठी त्याने ऑफिसमध्ये सुट्टी देखील घेतली होती. अचानक गुरुवारी सकाळी प्रणवच्या छातीत दुखु लागले होते. त्यामुळे त्याने खाजगी रूग्णालयात जाऊन उपचार घेतले होते. यावेळी डॉक्टरांनी त्याला ईसीजी ठिक असल्याचे म्हटले होते.

त्यानंतर दुपारी त्याने घरी आराम केला. नंतर संध्याकाळी साडेचारच्या सुमाराच पुन्हा त्याच्या अचानक छातीत कळ आली आणि तो कोसळला. कुटूंबियांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला तत्काळ सीपीआरमध्ये रूग्णालयात दाखल केलं. पण तो पर्यंत प्रणवचा मृत्यू झाला होता. अवघ्या 25 वर्षाच्या तरूणाचा आकस्मिक मृत्यू झाल्याने कुटूंबियांना मोठा धक्का बसला आहे. तसेच या घटनेने कोल्हापूरात हळहळ व्यक्त होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -