Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर : तारीख पे तारीख ! आता फुटबॉल हंगाम या तारखेला होणार...

कोल्हापूर : तारीख पे तारीख ! आता फुटबॉल हंगाम या तारखेला होणार सुरु

कोल्हापुरात होणाऱ्या संतोष ट्रॉफी आणि शिवाजी विद्यापीठ स्पर्धांमुळे पुन्हा फुटबॉल हंगाम लांबणीवर पडला. यापूर्वी सौंदत्ती यात्रा आणि आता विद्यापीठ स्पर्धेमुळे हंगाम लांबणीवर पडल्याने तमाम फुटबॉल प्रेमी व खेळाडूमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मात्र आता कोल्हापूर स्पोर्ट्स असोशिएनकडून नव्याने हंगाम घोषित करण्यात आला आहे. वारंवार हंगाम पुढे ढकलत असल्याने उर्वरित स्पर्धा पावसाळ्यापूर्वी होतील का? असा सवाल फुटबॉल प्रेमींकडून केला जात आहे.

कोल्हापूरचा फुटबॉल हंगाम हा २७ डिसेंबर पासून सुरु होणार असल्याचे पत्रक केएसए ने जारी केले आहे. सलामीचा सामना फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ विरुद्ध संध्यामठ तरुण मंडळ अ यांच्यात दुपारी दोन वाजता होणार आहे.

कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन कोणत्याही एका संघाची, पेठेची किंवा तालमीची बाजू न घेता, केवळ खेळाडूंच्या भविष्यातील हितासाठी श्रीमंत शाहू छत्रपती (केएसए) वरीष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धा पुढे ढकलली आहे,” असा खुलासा केएसएचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती यांनी पत्रकार परिषदेत केला.

ते म्हणाले,संतोष ट्रॉफीसाठी निवड चाचणी शिबीरासाठी वरिष्ठ संघातील सात खेळाडू मुंबईला रवाना झाले आहेत. जबलपुर येथेही पश्चिम विभागीय आंतर विद्यापीठ फुटबॉल स्पर्धेसाठी वरिष्ठ संघातील काही खेळाडू गेले आहेत. ही कोल्हापुरसाठी अभिमानाची बाब असुन, या खेळाडूंची राज्य संघात निवड झाल्यास त्यांच्या भविष्याचे हित आहे. याचा विचार करूनच हंगामी तारीख निश्चित केली जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -