Friday, November 22, 2024
Homeमहाराष्ट्रया ठिकाणी कलम 144 लागू होणार, वाहतूक मार्गातही बदल..

या ठिकाणी कलम 144 लागू होणार, वाहतूक मार्गातही बदल..

पुण्यातील भीमा कोरेगावात दरवर्षी 1 जानेवारीला शौर्य दिन साजरा केला जातो. विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने 31 डिसेंबर रोजी मध्यरात्रीपासून 2 जानेवारी 2023 रोजी मध्यरात्रीपर्यंत कलम 144 प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केले आहेत.

भीमा कोरेगावात यंदा शहर व ग्रामीण पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. येत्या 2 जानेवारी पर्यंत जमावबंदीचे आदेश लागू असणार आहेत. अनुयायांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरेगाव भीमा परिसरामध्ये 240 सीसीटिव्ही कँमेरे आणि ड्रोन कँमेरातून बारीक नजर ठेवली जाणार आहे. पुणे शहर आयुक्तालयामधील गावांमध्ये स्थानिक प्रशासन व पोलिसांच्या लेखी परवानगीविना सार्वजनिक ठिकाणी बॅनर, फ्लेक्स, होर्डिंग लावण्यास प्रतिबंध असणार आहे.

विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर भीमा कोरेगाव, पेरणे फाटा परिसरात व्हॉट्सअ‍ॅप, टि्वटर, इंस्टाग्राम, फेसबुक अशा समाजमाध्यमांद्वारे अफवा, जातीय द्वेष पसरवणारे खोटे संदेश, खोटी/चुकीची माहिती पोस्ट करणार्‍यांवर कडक कारवाई होणार आहे.

वाहतूक मार्गात बदल..

▪️ 1 जानेवारी रोजी अहमदनगर कडून पुणेकडे जाणारी सर्व वाहने शिक्रापूर चौकातून चाकणमार्गे.
▪️ पुणेकडून अहमदनगरकडे जाणारी वाहने येरवडा, आळंदीमार्गे चाकण-शिक्रापूर दिशेने खराडी मार्गे हडपसर, केडगाव चौफुला मार्गे शिरूर दिशेने.
▪️ नगर बाजूने हडपसरच्या दिशेने येणारी सर्व जड वाहने न्हावरा फाटा तसेच केडगावमार्गे वळविण्यात येणार आहेत.

▪️ आळंदी बाजूने अहमदनगर कडे जाणारी वाहने मरकळ, शेलपिंपळगावमार्गे शिक्रापूर बाजूने वळविण्यात येणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -