Sunday, August 3, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात हुल्लडबाजांकडून साडे तीन लाखांवर दंड वसूल, 641 जणांची रस्त्यावर उतरवली!

कोल्हापुरात हुल्लडबाजांकडून साडे तीन लाखांवर दंड वसूल, 641 जणांची रस्त्यावर उतरवली!

नव्या वर्षात स्वागत करताना हुल्लडबाजी, अवैध मद्यविक्री, जुगारी, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना कोल्हापूर पोलिसांना पहिल्याच दिवशी चांगलाच धडा दिला.पोलिसांनी दणकून कारवाई करताना एका दिवसात पोलिसांनी 641 वाहनचालकांकडून 3 लाख 34 हजारांवर दंड वसूल केला. मद्यप्राशन करून वाहन चालविणाऱ्या 25 चालकांसह वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 633 वाहनचालकांवर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून 3 लाख 34 हजारांवर दंड वसूल केला. जिल्ह्यातील सर्व प्रमुख मार्ग आणि गर्दीच्या ठिकाणी नाकाबंदी करून पोलिसांनी वाहनांची तपासणीही केली.

कोल्हापूर शहर जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी
एका जुगार अड्ड्यावर छापा टाकून 1 लाख 27 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत कारवाई केली. यंदा पोलिसांनी 31 डिसेंबरला संपूर्ण जिल्ह्यातच कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. शहरात येणाऱ्या सर्वच मार्गांवर वाहनांची कसून तपासणी केली जात होती; तर शहरातही चौकाचौकांत पोलिसांनी थांबवून कारवाई केली. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही, यासाठी पोलिस सतर्क होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. स्थानिक गुन्हे अन्वेषणमार्फत ही कारवाई करण्यात आली. थर्टी फर्स्टला कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी कोल्हापूर पोलिस दलामार्फत यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना दिल्या होत्या. शहर, जिल्ह्यात ठिकठिकाणी नाकाबंदी केली होती. मद्यधुंद अवस्थेत वाहने पळविणार्यांविरुद्ध गुन्हे दाखल करून 25 वाहने जप्त केली आहेत.

काल दिवसभर आणि आज पहाटेपर्यंत हुल्लडबाजांवर कारवाया सुरू होत्या. वर्षअखेरीस पोलिसांनी अवैध मद्यविक्री करणाऱ्या सहा ठिकाणी छापे टाकून 7 संशयितांवर गुन्हा दाखल केला. 71 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. दोन जुगार अड्ड्यांवरील कारवाईत 56 हजार 780 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांना मिळाला. दरम्यान, पोलिसांनी शहरानजीक काही फार्म हाऊसवरही झाडाझडती करत अवैध मद्याची चौकशी केली. त्यामुळे शहराजवळील ग्रामीण भागातही कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मध्यरात्रीनंतर रस्त्यावर उतरून जल्लोष करणाऱ्या नागरिकांनाही त्यांनी हटकले. त्यामुळे मध्यरात्रीनंतर सर्वत्र शांतता होती.

दुसरीकडे कोल्हापूर जिल्ह्यात गोवा बनावटीच्या दारूची तस्करी रोखण्यासाठी जिल्ह्यात 6 ठिकाणांवर तपासणी नाके उभे करण्यात आले होते. गोव्यातून थर्टी फर्स्टच्या जल्लोषासाठी दारू तस्करी होण्याची शक्यता असल्याने सीमाभागात तपासणी नाके उभारण्यात आले होते. कागल चेकपोस्ट, चंदगडमध्ये तिलारी, आजरा रोडवरील गौसे तिट्टा, गगनबावडा येथे करूळ घाटात, राधानगरी येथे अभयारण्याजवळ फेजिवडे परिसरात आणि शाहूवाडीत आंबा घाटात पथके तैनात असतील. प्रत्येक वाहनाची चौकशी करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -