Monday, February 23, 2026
Homeक्रीडाबुमराह इज बॅक! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियात मोठा बदल

बुमराह इज बॅक! श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी टीम इंडियात मोठा बदल

भारत विरुद्ध श्रीलंका संघात 3 जानेवारीपासून तीन सामन्यांची टी20 मालिका खेळवली जाणार आहे. त्यानंतर 10 जानेवारीपासून वनडे मालिकेला सुरुवात होईल. दरम्यान वनडे मालिकेसाठी भारतीय निवड समीतीने भारतीय संघात मोठा बदल केला आहे.

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे.

बुमराह सप्टेंबर 2022 पासून भारतीय संघातून बाहेर होता. त्याला पाठीच्या दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर राहावे लागले होते. बुमराह ऑस्ट्रेलियामध्ये गेल्यावर्षी झालेल्या टी20 वर्ल्डकपलाही या दुखापतीमुळे मुकला होता.

पण आता तो या दुखापतीतून सावरला आहे. तो सध्या बंगळुरूमधील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) रिहॅबिलेटशन प्रोग्राम करत होता. एनसीएने तो पूर्ण तंदुरुस्त झाल्याचे स्पष्ट केले आहे.

त्यामुळे त्याचा श्रीलंकेविरुद्धच्या आगामी वनडे मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. आता या मालिकेसाठी त्याच्यासह भारतीय संघात मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंग या वेगवान गोलंदाजांचाही समावेश आहे. तसेच अष्टपैलू हार्दिक पंड्याही या वेगवान गोलंदाजी फळीचा भाग आहे.

दरम्यान, श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी विश्रांती दिलेले रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुल, श्रेयस अय्यर यांसारखे खेळाडूही वनडे मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करणार आहेत.

वनडे मालिकेतील पहिला सामना गुवाहाटी येथे 10 जानेवारी रोजी होणार आहे. त्यानंतर 12 जानेवारी आणि 15 जानेवारी रोजी अनुक्रमे दुसरा आणि तिसरा सामना कोलकाता आणि तिरुअनंतपुरम येथे होणार आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघ –

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, अर्शदीप सिंग.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -