Sunday, July 27, 2025
Homeतंत्रज्ञानRedmi Note 12 Pro 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात 'या' तारखेला लॉन्च होणार

Redmi Note 12 Pro 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात ‘या’ तारखेला लॉन्च होणार

ताजी बातमी ऑनलाईन टीम

Redmi Note 12 Pro 5G स्मार्टफोन भारतीय बाजारात येत्या 5 जानेवारी 2023 ला लॉन्च होणार आहे. यासोबतच Redmi Note 12 Pro+ 5G स्मार्टफोन देखील लॉन्च करण्यात येणार आहे. कंपनीने केलेल्या घोषणेनुसार,दोन्ही मिडरेंज स्मार्टफोन्स Note 12 series च्या धर्तीवर लॉन्च करण्यात येणार आहे. दरम्यान, Redmi Note 12, Note 12 Pro आणि Note 12 Pro + आधी चीनमध्ये ऑक्टोबर महिन्यात लॉन्च करण्यात आला होता.


Redmi च्या अधिकृत वेबसाइटवर एक टीझर इमेज जारी करण्यात आली आहे. Redmi Note 12 Pro स्मार्टफोन भारतीय बाजारात पुढील वर्षी 5 जानेवारी 2023 ला लॉन्च करण्यात येणार आहे. या फोनमध्ये बॅक पॅनल देण्यात आले आहे. तसेच ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देखील देण्यात आला आहे. रेडमीच्या टीझरमध्ये Redmi Note 12 Pro 5G चे काही खास स्पेसिफिकेशन्स देखील सांगण्यात आले आहेत.

अपकमिंग हँडसेटमध्ये फ्लॅगशिप हॅप्टिक एक्सपीरिएन्स देखील मिळेल. मात्र, कंपनीने Redmi Note 12 Pro 5G च्या भारतीय बाजारातील किंमतीबाबत खुलासा केलेला नाही. चीनमध्ये हा फोनची किंमत CNY 1699 (जवळपास 19,300 रुपये) ला लॉन्च करण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -