Thursday, November 21, 2024
Homeआरोग्यविषयक'ही' दोन खोकल्याची औषधं लहान मुलांना देऊ नका, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा!

‘ही’ दोन खोकल्याची औषधं लहान मुलांना देऊ नका, जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा!

काही दिवसांपूर्वी उझबेकिस्तानमध्ये कफ सिरपचे सेवन केल्यामुळे तब्बल १९ लहान मुलांचा मृत्यू झाला होता. मारयॉन बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड या मूळच्या भारतीय कंपनीने तयार केलेल्या कफ सिरपच्या सेवनामुळे ही घटना घडली, असा दावा करण्यात येत होता. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेने या कंपनीचे दोन कफ सिरप लहान मुलांना देऊ नये, असे आवाहन केले आहे.

मूळच्या उत्तर प्रदेशच्या मारयॉन बायोटेक कंपनीकडून Ambronol आणि DOK-1 Max या दोन कफ सिरपचे उत्पादन घेतले जाते. याच दोन फक सिरपची चाचणी केल्यानंतर यामध्ये डायइथिलीन ग्लायकोल तसेच इथिलीन ग्लायकोल हे घटक योग्य प्रमाणात नसल्याचे समोर आले आहे. याच कारणामुळे जागतिक आरोग्य संघटनेने लहान मुलांना मारयॉन बायोटेक या कंपनीचे वरील दोन कफ सिरप देऊ नये, असे आवाहन केले आहे.

उझबेकिस्तानमध्ये नेमकं काय घडलं होतं?

डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मारियॉन बायोटेक या कंपनीने निर्माण केलेल्या कफ सायरपच्या सेवनामुळे उझबेकिस्तानमध्ये १९ मुलांचा मृत्यू झाला होता. श्वसनाचा विकार जडल्यामुळे या मुलांचा मृत्यू झाला होता. मृत्यू झालेल्या या मुलांना रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांच्या पालकांकडून डॉक-१ मॅक्स सायरप देण्यात आले होते. मुलांना २ ते ७ दिवस हे औषध दिवसातून ३ ते ४ वेळा देण्यात आले होते. प्रमाणापेक्षा जास्त औषध दिल्यामुळे मुलांचा मृत्यू झाला होता. या घटनेची दखल उझबेकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने घेतली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -