Sunday, August 3, 2025
Homeकोल्हापूरखासदार धैर्यशील माने यांना जिल्हा बंदी केल्याने कोल्हापूरात तणावाचे वातावरण

खासदार धैर्यशील माने यांना जिल्हा बंदी केल्याने कोल्हापूरात तणावाचे वातावरण

कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांना कर्नाटक सरकार व मुख्यमंत्री बोम्मई यांनी खासदार धैर्यशील माने यांना जिल्हा बंदी केली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सध्या तणावाचे वातावरण बनले आहे. याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्हाप्रमुख रवींद्र माने यांच्या नेतृत्वाखाली आज कर्नाटक सरकारच्या विरोधात शिवतीर्थ येथे रास्ता रोको व निदर्शन करण्यात आली.

यावेळी कर्नाटक सरकारची बस आली असता यावेळी बस अडवून निदर्शने करण्यात आली. यावेळी कर्नाटक बस वर काही शिवसैनिकांनी लाथा बुक्क्या मारल्या व बसवर चढण्याचाही प्रकार केला. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण बनले होते. यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी रवींद्र माने, भाऊसो आवळे, रवी रजपुते, महेश ठोके, नागेश पाटील आदि कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -