ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोल्हापूर गगनबावडा जाणाऱ्या रोडवर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी कारवाई करून बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतलंय. त्यांच्याकडून संगणक, प्रिंटर व इतर साहित्यासह क्रेटा कार व मोबाईल असा एकूण १२,६२,४८०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय.
याबाबतची अधिक माहिती अशी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकातील पोलीस अमंलदार विजय गुरखे यांना, पांढऱ्या रंगाची हुंडाई कंपनीची क्रेटा कार नं. एम.एच.०९ डी. एक्स. ८८८८ मधून बनावट नोटा घेवून काही इसम कळे-कोल्हापूर रोडने येणार असल्याची बातमी मिळाली.
यानुसार पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक शेषराज मोरे, पोलीस अंमलदार विजय गुरखे, वैभव पाटील, सचिन देसाई, अनिल पास्ते, हिंदूराव केसरे, रणजित पाटील, दिपक घोरपडे, सोमराज पाटील व रफिक आवळकर यांच्या पथकाने कोल्हापूर – गगनबावडा जाणारे रोडवरील मरळी फाटा, ता. पन्हाळा येथे सापळा लावला. त्यानुसार क्रेटा कार आडवून कारमधील चंद्रशेखर बाळासाहेब पाटील (वय ३४, रा. कसबा तारळे, ता. राधानगरी), अभिजीत राजेंद्र पवार (वय ४०, रा.गडमुडशिंगी, ता. करवीर), दिग्वीजय कृष्णात पाटील (वय २८, रा. जयभवानी तालमीसमोर, शिरोली पुलाची, ता. हातकणंगले) यांची कारसह झडती घेतली.