Friday, August 1, 2025
Homeतंत्रज्ञानइंस्टाग्राम रील्स पाहायला आवडतात? मग Jio चा हा प्लॅन फक्त तुमच्यासाठीच!

इंस्टाग्राम रील्स पाहायला आवडतात? मग Jio चा हा प्लॅन फक्त तुमच्यासाठीच!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मुंबई, अनेक जण इंटरनेटचा वापर फक्त सोशल मिडीयासाठी करतात. अशात इंटरनेटचा महागडा प्लॅन त्यांच्या खिशाला कात्री लावणारा असतो. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच काही प्लॅनची माहिती देणार आहोत, जे दररोज 1GB डेटा देतात. या योजना अशा लोकांसाठी अतिशय योग्य आहेत ज्यांच्या कार्यालयात आणि घरात वाय-फाय आहे आणि त्यांचा मोबाईल डेटा दररोज वाया जातो. अशा परिस्थितीत Jio चा हा प्लॅन तुमच्यासाठी योग्य आहे. जाणून घेऊया काय आहे हा प्लॅन ?

सोशल मीडिया स्क्रोलिंगसाठी सर्वोत्तम प्लॅन
जर तुम्ही तुमचा मोबाईल डेटा फक्त सोशल मीडिया स्क्रोल करण्यासाठी आणि रील्स पाहण्यासाठी वापरत असाल तर Realince Jio कडे तुमच्यासाठी काही परवडणारे प्रीपेड प्लॅन आहेत. या प्लॅन्समध्ये तुम्हाला अमर्यादित कॉलिंग, SMS सह दररोज 1GB डेटा मर्यादा मिळते. या प्लॅनची किंमत 200 रूपयांपेक्षा कमी आहे.

जिओचा 209 रुपयांचा प्रीपेड प्लॅन आहे.

जिओचा हा प्रीपेड प्लान 28 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएसची सुविधा मिळते. जोपर्यंत इंटरनेट डेटाचा संबंध आहे, या प्लॅनमध्ये दररोज 1GB डेटासह एकूण 28GB डेटा मिळतो. दैनंदिन डेटा वापरल्यानंतर, इंटरनेटचा वेग 64kbps पर्यंत कमी होतो .



RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -