Tuesday, July 29, 2025
Homeमनोरंजनपठाण 'KGF-2' चा 5 लाख तिकिटांचा विक्रम मोडत दाखल

पठाण ‘KGF-2’ चा 5 लाख तिकिटांचा विक्रम मोडत दाखल

बॉलिवूडचा किंग अर्थातच शाहरुख खानचा बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित ‘पठान’ हा चित्रपट आज प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे.
अॅडव्हान्स बुकिंगच्या बाबतीतही ‘पठाण’ने ‘KGF-2’चा 5 लाख तिकिटांचा विक्रम मोडित काढला आहे. तर दुसरीकडे चित्रपटाला अनेक ठिकाणी निषेधही होतोय.

चित्रपट – पठाण
वेळ – 146 मिनिटे
दिग्दर्शक- सिद्धार्थ आनंद
कलाकार- शाहरुख खान, जॉन अब्राहम, दीपिका पदुकोण, डिंपल कपाडिया, आशुतोष राणा

चित्रपटाची कथा:
चित्रपटाची कथा आहे एका माजी भारतीय एजंटची, ज्याचे नाव आहे जिम. त्याच्या कुटुंबाला त्याच्या डोळ्यांदेखत मारण्यात येते. कारण भारत त्यांच्या सुटकेसाठी प्रयत्न करत नाही. जिम मारला गेला, असे गृहीत धरून भारत सरकार त्याला शौर्य पुरस्काराने सन्मानित करते. पण जिम जिवंत असतो. काही काळानंतर, आपल्या कुटुंबाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी जिम पाकिस्तानशी हातमिळवणी करतो आणि भारताविरोधात लढण्यासाठी बायोलॉजिकल शस्त्र तयार करतो.

भारताकडून जिमला रोखण्यासाठी पठाण आणि त्याची टीम सज्ज असते. मिशनदरम्यान पठाण डॉ. रुबिना खानला भेटतो, ज्यामुळे पठाणचे मिशन अधिक कठीण होते. आता पठाण बलाढ्य जिमला कसे अडवणार? तो त्याला रोखू शकणार की नाही? हीच या चित्रपटाची कथा आहे.

स्टार्सचा अभिनय :
पठाणच्या भूमिकेत शाहरुख खान शोभून दिसतोय. त्याला अभिनयाला तोड नाही. शाहरुखने आपल्या अ‍ॅक्शन सीनने सर्वांना इम्प्रेस केले आहे. दीपिका पदुकोणचा स्क्रीन प्रेझेन्स चांगला आहे, पण तिच्या वाट्याला दमदार संवाद आलेले नाहीत. तिला पाकिस्तानी डॉक्टर ते आयएसआय एजंटची भूमिका देण्यात आली आहे. पण तिच्या भूमिकेला पाकिस्तानी टच दिसत नाही. शिवाय तिच्या पाकिस्तानी एक्सेंटकडेही लक्ष देण्यात आलेले नाही.

डिंपल कपाडिया आणि आशुतोष राणा यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेला चोख न्याय दिला आहे. इथे उत्तम भूमिका जॉन अब्राहमची आहे. इंटेंस लूक आणि दमदार संवाद जॉनच्या पात्राला देण्यात आले आहेत. जॉनचे पात्र जेव्हा-जेव्हा आले, तेव्हा ते शाहरुखवर भारी पडलेले दिसले. त्याची अॅक्शन शाहरुखवर वरचढ ठरलेली दिसते. चित्रपटातील जॉनची डायलॉग डिलिव्हरी अप्रतिम आहे.

दिग्दर्शन, पटकथा
दिग्दर्शनाबद्दल बोलायचे झाले तर सिद्धार्थ आनंदचे दिग्दर्शन उत्कृष्ट आहे. सगळी दृश्ये छान मांडली आहेत. पटकथेच्या बाबतीत हा चित्रपट उत्कृष्ट बनवला गेला आहे, त्यात उणीवा शोधणे कठीण आहे.

संगीत :
पठाणचे पार्श्वसंगीत अगदी फ्रेश आहे. संगीताचा अतिवापर केलेला नाही, हा त्याचा प्लस पॉइंट आहे. पठाणचे अँथम काही ठिकाणीच वापरले गेले आहे. प्रत्येक दृश्यासाठी नवीन संगीत, प्रत्येक सीन फ्रेश बनवते.

VFX आणि स्पेशल इफेक्ट्स
अ‍ॅक्शन सीन्समधील उच्च दर्जाचे VFX तुम्हाला तुमच्या जागेवर खिळवून ठेवतात. सीन्स खोटे आहेत, असे तुम्हाला कुठेही वाटणार नाही, हा त्याचा प्लस पॉइंट आहे. अ‍ॅक्शन सीन्स लक्ष वेधून घेणारे आहेत.

सलमान येथे काही मिनिटांच्या कॅमिओमध्ये दिसतो, जो संथ चित्रपटाचा वेग वाढवतो. इथे सलमान टायगर बनून मित्र पठाणला मदत करतो. इथे आणखी एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे ही कथा मिशनपासून सुरू झाली आणि मिशनवरच संपते. संपूर्ण चित्रपटात एकच गाणे आहे आणि ते म्हणजे बेशरम रंग. याशिवाय चित्रपट संपल्यानंतर दुसरे गाणे पाहायला मिळते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -