ताजी बातमी ऑनलाईन टीम
मागील आठ दिवसांच्या कालावधीत विश्रामबाग परिसरातील
विविध भागातून चोरट्यांनी गँस सिलेंडरच्या नऊ टाक्या चोरल्या
असल्याचे उघड झाले आहे. प्रामुख्याने दुपारच्या सुमारास घरात
शिरुन तसेच अपार्टमेंटमध्ये घराच्या बाहेर ठेवलेल्या टाक्या चोरण्यात आल्या आहेत. यातील एका ठिकाणी चोरट्याने दोन सिलेंडरच्या टाक्यासमवेत टिव्ही आणि लॅपटॉप देखील लंपास केल्याची घटना घडली आहे.
स्वप्ननगरी परिसरात राहणाऱ्या संदीप आनंदराव रहाटे यांनी त्यांच्या बंगल्याच्या पार्किंगमध्ये गॅस टाकी ठेवली होती. दि. १५ रोजी दिवसभरात ती टाकी चोरट्याने पळवून नेली. विधाता कॉलनीतील लक्ष्मीनिवास बंगल्यात रामसरन रामनिहाल वर्मा राहतात. दि. १४ राजी सकाळच्या सुमारास पार्किंगमध्ये ठेवेलेली गॅस टाकी चोरट्याने लंपास केली. राजेंद्र कवठेकर ( रा. शंभर फुटी रस्ता, सांगली) यांच्या घरातील गॅस टाकी दि. २० रोजी सकाळच्या सुमारास कोणाचे लक्ष नसल्याचे पाहून लंपास केली. स्फुर्ती चौकात राहणाऱ्या पटवर्धन आर्केड चोरट्यांनी सदामते यांचा एक मोबाईल ही चोरला. तसेच कृषी कॉलनीत राहणाऱ्या किरण वसंतराव गडचे यांनी अपार्टमेंटच्या फ्लॅटच्या समोरील मोकळ्या जागेत ठेवलेली गॅस टाकी चोरट्याने चोरली.
सांगली ; सिलेंडर टाकी चोरणाऱ्या चोरट्यांचा धमाकूळ
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -