ताजी बातमी ऑनलाईन टीम
मिरज तालुक्यातील अंकलीमध्ये दुकानावरील बोर्ड काढताना मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट केल्याच्या भागातून एका युवकाला काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली. याप्रकरणी सुशीला गिरीश पाटील (वय ४५) यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सतीश कुमार सूर्यवंशी वय ३६ याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सुशीला पाटील या अंकलीमध्ये कुटुंबीयांसह राहतात शुक्रवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुशीला पाटील आणि त्यांचा मुलगा असे दोघेजण अंकली मधील त्यांच्या गोडाऊन जवळ उभे होते यावेळी संशयित सतीश सूर्यवंशी हा ग्रामपंचायत ने लावलेला डिजिटल बोर्ड फाडून दाखवत होता यावेळी सदरचा प्रकार सुशीला पाटील यांच्या मुलाने मोबाईल मध्ये कैद केला मोबाईल मध्ये शूटिंग करत असल्याचे पाहून सूर्यवंशी याने काठीने त्यांच्या मुलाला बेदम मारहाण केली त्याच्या हाताचा चावा घेत त्याला जखमी केले त्यानंतर धमकी देऊन तेथून तो निघून गेला घडलेल्या या प्रकारानंतर सुशीला पाटील यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिरत दाखल केली त्यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सूर्यवंशी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सांगली ; किरकोळ कारणातून युवकास बेदम मारहाण
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -