27 जुलै पासून या महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू होणार आहे. सध्या ITR भरण्याची तारीख जवळ येत असल्याने बँकांशी संबंधित तपशील त्यात द्यावा लागत असल्याने या आठवड्यात बँका कधी सुरू असणार आणि कधी बंद असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे.
ग्राहकांची हाल होऊ नये आणि व्यवहार सुरळीत चालत राहावे यासाठे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आधीच सुट्ट्यांचे कॅलेंडर जाहीर केले आहे.
पुढच्या आठवड्यात बँकाचे व्यवहार
27 जुलै ते 31 जुलै महाराष्ट्रातील बँका पूर्णवेळ सुरू राहणार आहेत. त्यामुळे ग्राहकांना बँकेत जाऊन व्यवहार करण्यास कोणताही अडथळा नाही. तसेच या दिवसांत शनिवार आणि रविवार नसल्याने बँकांचे कामकाज सुरू राहील.
2 ऑगस्ट ला सुट्टी
पुढच्या आठवड्यात सुट्टी ही डायरेक्ट 2 ऑगस्ट ला असणार आहे. कारण या दिवशी रविवार असल्याने बँकांना सार्वजनिक सुट्टी असणार आहे.
ऑनलाइन सेवा सुरू
पुढच्या आठवड्यात बँकाच्या शाखा सोमवार ते शनिवार पूर्णवेळ सुरू असणार असून याकाळात डिजिटल बँकिंग सेवाही ग्राहकांसाठी सुरू राहतील. ग्राहक UPI, NEFT, RTGS, मोबाइल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून पैसे ट्रान्सफर करणे, बिल भरणे आणि ऑनलाइन व्यवहार करणे सुरू ठेवू शकतात.


