Saturday, April 13, 2024
Homeआरोग्यविषयकनिगेटीव्ह कोविड टेस्ट देखील पॉझिटीव्ह दाखवू शकतात 'हे' ड्रिंक्स

निगेटीव्ह कोविड टेस्ट देखील पॉझिटीव्ह दाखवू शकतात ‘हे’ ड्रिंक्स


कोरोना व्हायरस संसर्गाची चाचणी करण्यासाठी घरी चाचणी होणाऱ्या किटचा वापर वाढला आहे. अनेकवेळा लोक घरी कोरोना संसर्ग तपासण्यासाठी कोविड टेस्टिंग किट वापरतायत. यामुळे त्यांना कोविड – 19ची लागण झाली आहे की नाही हे कळू शकतं. परंतु एका नवीन अभ्यासात शास्त्रज्ज्ञांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे.


False Positive रिजल्ट
या अभ्यासानुसार, काही ड्रिंक्स आहेत जी कोविड चाचणीच्या रिझल्टवर परिणाम करतात आणि False Positive परिणाम दर्शवू शकतात. At-home Testing kits हा लोकांसाठी एक चांगला पर्याय मानला जातो कारण, ते सोयीस्कर आहे आणि तुम्ही बाहेरचा संपर्क टाळता.


संसर्गाचा धोका टाळण्यासाठी, बर्याच लोकांना सार्वजनिक ठिकाणी चाचणीसाठी जाणं सुरक्षित वाटत नाही. तज्ज्ञ म्हणतात की, असं नाही की या किटवर विश्वास ठेऊ शकतं नाही. परंतु जर तुम्हाला पॉझिटीव्ह रिपोर्ट हवा असेल तर ते खूप सोपं आहे. हे दाखवणं शक्य आहे.


ड्रिंक्सचा परिणाम
Infectious disease वर रिसर्च करणाऱ्या संशोधकांना असं आढळलं की, काही पेयांचा कोविड -19 चाचणीवर परिणाम होतो. जर्मनीतील Tübingen University मध्ये Tropical Medicineचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांच्या गटाने हा अभ्यासInternational Journal of Infectious Diseaseमध्ये प्रकाशित केला आहे.
वैज्ञानिकांनी या अभ्यासात सांगितलं की, PCR COVID-19 Test अजूनही अचूकतेसाठी गोल्ड स्टँडर्ड मानली जाते. त्याच वेळी, कोविड -19 अँटीजेन किटची स्व-चाचणी देखील ऑन टार्गेट आहे. अशा किटचा वापर शाळा, वर्कप्लेस, घर या सर्व ठिकाणी केला जातो. त्यांनी अचूक चाचणी परिणाम देखील दिले आहेत.


रेड टेस्ट लाइन
संशोधक म्हणतात की, सॉफ्ट ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स, अल्कोहोल, कमर्शियली बॉडल्ट मिनरल वॉटर आणि कार्बोनेटेड मिनरल वॉटर टेस्टिंग किटवर रेड टेस्ट लाइन दाखवू शकतात. किटवरील रेड टेस्ट लाइन सकारात्मक संसर्ग दर्शवतं.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -