ताजी बातमी ऑनलाईन टीम
पन्हाळा: ‘जय भवानी, जय शिवाजी” छत्रपती शिवाजी महाराज की जय’ या जय घोषाने पन्हाळगडावरील वातावरण शिवमय बनले आहे. उद्या, रविवारी साजऱ्या होणाऱ्या शिवजयंतीनिमित्त पन्हाळगडावरुन शिवज्योत नेण्यासाठी गेले दोन दिवसांपासूनच गडावर शिवभक्तांची गर्दी झाली आहे.
महाराष्ट्रातील एकमेव शिवमंदिर पन्हाळगडावर असून या ठिकाणाहून शिवभक्त शिवज्योत नेतात. पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूरसह कर्नाटक राज्यातील शिवभक्तांची शिवज्योत नेण्यासाठी पन्हाळगडावर मोठी गर्दी झाली होती. यासाठी पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषदेने प्रत्येक शिवज्योत नेणाऱ्या मंडळांना मानाचा नारळ व सन्मानपत्र देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
त्याचबरोबर शिवमंदिर, बाजीप्रभू, शिवाकाशिद याठिकाणी आकर्षक विद्युत रोषणाई केली आहे. विद्युत रोषणाई पहायला पर्यटकांची मोठी गर्दी झाली होती. तसेच येणाऱ्याशिवभक्तांसाठी लाईट, पाणी याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. पन्हाळ्याहून शिवजयंतीसाठी १२०० ते १५०० शिवज्योती नेण्यात येतात.
ऐतिहासिक पन्हाळा गडावरुन शिवज्योती नेण्यासाठी शिवभक्तांची गर्दी
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -






