Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरआडी डोंगरावरील श्रावणी यात्रा रद्द; उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांची माहिती

आडी डोंगरावरील श्रावणी यात्रा रद्द; उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांची माहिती

कर्नाटक(karnatak) महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आडी डोंगरावरील श्री मल्लिकार्जुन मंदिरात श्रावण महिन्यात दि. 23 रोजी सोमवारी भरणारी यात्रा रद्द करण्यात आली आहे. शासनाच्या निर्देशानुसार हा निर्णय घेतला असून केवळ धार्मिक विधी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती निपाणी ग्रामीण पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांनी दिली.


बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या आंध्रप्रदेशातील श्रीशैल मल्लिकार्जुनची शाखा म्हणून आडी संजीवनगिरीवरील मल्लिकार्जुन मंदिर ओळखले जाते. येथे गुढीपाडवा काळात होणारा किरणोत्सव, महाशिवरात्री, दसरा उत्सव तसेच प्रत्येक सोमवारी व अमावस्येला दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते. याशिवाय श्रावण महिन्यात दररोज धार्मिक उपक्रम मोठ्या प्रमाणात होत असतात. श्रावणातील प्रत्येक सोमवारी येथे दर्शनासाठी भक्तगण मोठ्या प्रमाणात येतात.तर ,तिसऱ्या सोमवारी मुख्य यात्रेवेळी लाखो भाविक उपस्थित असतात.


मात्र कोरोनामुळे शासनाने कडक निर्बंध लागू केल्यामुळे गेल्यावर्षी श्री मल्लिकार्जुनाची श्रावणी यात्रा झाली नव्हती. मात्र गेल्या दोन महिन्यात शासनाने कोरोनाचे निर्बंध हटविल्यामुळे श्रावणी यात्रा होईल, अशी शक्यता होती. पण महाराष्ट्र व केरळ राज्यात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढत असल्यामुळे बेळगावसह सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये पुन्हा निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे यंदा दि. 23 रोजी ची श्रावणी यात्रा रद्द करून केवळ धार्मिक विधीला परवानगी देण्यात आली आहे, अशी माहिती उपनिरीक्षक कुंभार यांनी दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -