ताजी बातमी ऑनलाईन टीम
हेरा फेरी’ चित्रपटाचे चाहते ज्या गोष्टीची गेले आतुरतेने वाट पाहत होते अखेर तो क्षण आलाच आहे. बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध फ्रँचायझी ‘हेरा फेरी’चा तिसरा भाग ‘हेरा फेरी 3’च्या चित्रीकरणाला अखेर सुरुवात झाल्याची बातमी नुकतीच समोर आलीये. महत्वाची गोष्ट म्हणजे या चित्रपटात नवीन चेहरा दिसणार नसून जुनी स्टारकास्ट म्हणजेच अक्षय कुमार सुनील शेट्टी आणि परेश रावल ‘हेरा फेरी 3’ चित्रपटात दिसणार आहेत. परंतु या स्टारकास्ट सोबत अजून एका कलाकाराची एन्ट्री होणार असल्याची चर्चा सुरु आहे. खरंतर या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत संजय दत्त दिसणार आहे.
बॉलिवूड हंगामा’ च्या रिपोर्टनुसार, बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला ‘हेरा फेरी 3’ या चित्रपटात खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. या चित्रपटातील संजय दत्तची भूमिका खूपच विनोदी असल्याचे सांगण्यात येतंय. त्याचबरोबर संजय दत्तची (Sanjay Dutt) भूमिका अंध आणि काहीशी विचित्र असेल, त्याचसोबत संजय दत्तनंदेखील हा चित्रपट करण्यासाठी होकार दिला असल्याचे म्हटले जाते.
Hera Pheri 3 चित्रपटात आणखी एका लोकप्रिय अभिनेत्याची एन्ट्री?
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -