Tuesday, February 27, 2024
Homeबिजनेसधक्कादायक : झी मराठीच्या चाहत्यांना मोठा धक्का, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

धक्कादायक : झी मराठीच्या चाहत्यांना मोठा धक्का, जाणून घ्या नेमकं काय घडलं?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

झी मराठी वाहिनीवरील सर्वच मालिका प्रेक्षकांमध्ये फार प्रसिद्ध आहेत. गेल्या काही दिवसांपासून या वाहिनीवर विविध धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या मालिकांच्या हटके विषयामुळे अनेक प्रेक्षक त्याला पसंती देताना पाहायला मिळतात.

झी मराठी ही वाहिनी गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. झी मराठीच्या सगळ्याच मालिका प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवतात. पण नुकतीच झी मराठीच्या प्रेक्षकांसाठी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. समोर आलेल्या माहिती नुसार झी मराठीचं सोशल मीडिया पेज हॅक झालं आहे.

झी मराठी च्या सर्व सोशल मीडिया अकाउंट्स हॅक झालं असून सगळ्या पोस्ट्सची उलटापालट झाली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच चर्चा आहे. Zee Marathi चं इंस्टाग्राम, फेसबुक वरच्या सर्व पोस्ट्स उलट्या दिसत आहेत. त्यामुळे सगळ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत. नेमकं प्रकरण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे.

झी मराठी नेहमीच आपल्या प्रेक्षकांसाठी नवनवीन आशय विषय प्रेक्षकांना देत असतात. सध्या झी मराठीचे सोशल मीडिया अकाऊंट हॅक झालं असल्याची माहिती वाऱ्यासारखी व्हायरल झाली आहे. त्यामध्ये सर्व पोस्ट उलट्या पालट्या दिसत असल्याने सर्वत्रच खळबळ उडाली आहे.

या वाहिनीने त्यांचे लोकप्रिय ठरलेले शो पुन्हा प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार झी मराठीने ‘होणार सून मी या घरची’ आणि ‘का रे दुरावा’ या दोन मालिका पुन्हा प्रक्षेपित करण्याचा निर्णय घेतला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -