Friday, February 7, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर: जानकी वृद्धाश्रमात अनोखा विवाह सोहळा

कोल्हापूर: जानकी वृद्धाश्रमात अनोखा विवाह सोहळा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

जयसिंगपूर : १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे. जागतिक प्रेम दिनाचे औचित्य साधून त्यांने तिला प्रपोज केलं. तिनेही त्याला होकार दिला आणि वयाच्या सत्तरीत त्यांनी रेशीमगाठ बांधून आयुष्याच्या नव्या पर्वाला सुरुवात केली. ही कोणती काल्पनिक कहाणी नाही किंवा ही गोष्ट कॉलेज तरुण-तरुणीची नाही तर ही प्रेम कहाणी आहे. ७५ वर्षीय बाबुराव आणि वर्षीय अनुसया यांची.

व्हॅलेंटाईन डेला केले प्रपोज
घोसरवाड (ता. शिरोळ) येथील जानकी वृद्धाश्रमातील ही लग्नाची गोष्ट सर्वांनाच नक्कीच विचार करावयास लावणारी आहे. १४ फेब्रुवारीला आश्रमातील मंडळी ‘रोटी डे’ साजरा करायला अन्य ठिकाणी गेलेली असताना बाबुराव यांनी या दिवसाचे औचित्य साधून चक्क अनुसया यांना प्रपोज केले. व्हॅलेंटाईन डे ला प्रपोज केले आणि अवघ्या पंधरा दिवसांच्या आतच त्यांचे लग्न लागले.
दोघेही होते पोरके घोसरवाड येथे बाबासाहेब पुजारी हे गेल्या अनेक वर्षांपासून वृद्धाश्रम चालवतात.

याच जानकी वृद्धाश्रमात बाबुराव पाटील (वय ७५, मूळ गाव शिवनाकवाडी, ता. शिरोळ) हे दीड वर्षापूर्वी आले. तर अनुसया शिंदे (वय ७०, मूळ गाव वाघोली, जि. पुणे) या सहा ते सात वर्षांपूर्वी आल्या. बाबुराव यांच्या पत्नीचे निधन होऊन सुमारे २२ वर्षांचा कालावधी लोटला आहे. अनुसया या आपल्या पती समवेत सहा ते सात वर्षांपूर्वी येथे आल्या. सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या पतीचे आश्रमातच वृद्धापकाळाने निधन झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -