Friday, December 27, 2024
Homenewsसून आणि सासरा एकाच खोलीत, मुलाने पाहिले नको त्या अवस्थेत आणि...

सून आणि सासरा एकाच खोलीत, मुलाने पाहिले नको त्या अवस्थेत आणि…

सासले आणि सून यांच्या कथित नात्यातील एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशातील जबलपूर(Jabalpur) जिल्ह्यात आपल्या वडिलांना आणि पत्नीला नको त्या अवस्थेत पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या 35 वर्षीय तरूणाने दोघांना कुऱ्हाडीचा घाव घालून संपविले.


ग्रामीण अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस. एस. बघेल यांनी शनिवारी सांगितले की, जिल्हा मुख्यालयापासून 50 कि.मी. अंतरावर असलेल्या गोकलाहार गावात संतोष लोधी यांने वडील अमन लोधी (65) आणि कविता (32) यांना शुक्रवारी रात्री कुऱ्हाडीने ठार मारले.अधिकाऱ्याने सांगितले की, चौकशी दरम्यान संतोषने पोलिसांना सांगितले की घरात वडिलांना आणि पत्नीला एका खोलीत नको त्या स्थितीत पाहून दोघांना ठार मारले.

ते म्हणाले की, आरोपीच्या नातेवाईकाने पोलिसांना घटनेची माहिती दिली.
आरोपी घराच्या उंबरठ्यावर बसला असताना पोलिसांच्या पथकाला खोलीत रक्तबंबाळ मृतदेह आढळले. ते म्हणाले की, दोन्ही मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संतोष लोधी आणि कविता लोधी यांचे 15 वर्षांपूर्वी लग्न झाले होते.

त्यांना 11 वर्षांचा मुलगा आणि एक 8 वर्षांची मुलगी आहे. या दुहेरी हत्याकांडानंतर शेजारचे रहिवासी असलेले संतोष लोधी यांचे काका अर्जुन लोधी दोन्ही मुलांना आपल्या घरी घेऊन गेले आहेत.
रिपोर्ट्सनुसार, हत्येनंतर संतोषने स्वत: काकांना माहिती दिली आणि सांगितले की, त्याने पत्नी आणि वडिलांना बरेच समजावले होते. परंतु दोघांनाही त्याचे ऐकले नाही. त्यांचे प्रेमसंबंध सुरुच होते.


आरोपीने सांगितले की त्याच्या पत्नीने त्याचा विश्वासघात केला आणि वडिलांनीही त्याचा विश्वास मोडला. बेलखेडा पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपींकडे पोलिसांकडून विचारपूस केली जात आहे. बेलखेडा पोलिसांनी आरोपीची कुर्हाड आणि रक्ताचे डाग असलेले कपडे जप्त केले आहेत.  

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -