Thursday, November 21, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापुरातील सराफाची अडीच लाखांची फसवणूक!

कोल्हापुरातील सराफाची अडीच लाखांची फसवणूक!


सोने आणि चांदीचे दागिने घेऊन त्यातील सुमारे अडीच लाखांची रक्कम देण्यास टाळाटाळ करून खरेदीदाराने सराफाची फसवणूक केली. हा प्रकार ३० मे २०२२ ते ३० जून २०२२ या कालावधीत घडला. याबाबत सराफ सरदार भिकाजी सासणे (वय ३१, रा. सरदार तालमीजवळ, शिवाजी पेठ, कोल्हापूर) यांनी जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार पोलिसांनी संशयित राकेश रजनीकांत रणदिवे (वय ५२, रा. गंगावेश, कोल्हापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला.

सासणे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या अष्टविनायक गोल्ड टेस्टिंग दुकानात संशयित रणदिवे हा दागिन्यांचा टंच काढण्यासाठी आणि दागिने तयार करून घेण्यासाठी येत होता. ३० मे ते ३० जून या कालावधीत रणदिवे याने फिर्यादींच्या दुकानातून पाच लाख सहा हजार १०८ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि एक लाख ८७ हजार ५९० रुपये किमतीचे चांदीचे दागिने तयार करून घेतले. या दागिन्यांच्या मजुरीसह एकूण अडीच लाख रुपये देण्यास टाळाटाळ करून रणदिवे याने फसवणूक केल्याची तक्रार सासणे यांनी जुना राजवाडा पोलिसांत दिली होती. त्या तक्रारीची चौकशी करून संशयिताच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक सतीशकुमार गुरव यांनी
दिली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -