हातकणंगले तालुक्यातील पारगाव येथे तात्यासाहेब कोरे वारणा मिलिटरी अकॅडमीच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरात एका झाडाला दोघांनी एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. पारगाव येथील बिरदेव नगर वसाहतीमध्ये राहणारे दोन युवक विनायक पाटील व त्याचा मित्र बाबासाहेब मोरे हे जिवलग मित्र होते. विनायक पाटील यांचा चिरा ओढण्याचा व्यवसाय असून दोघेही गाडीवरून कोकणात जाऊन चिरा आणत व त्याची विक्री करत असत. मित्र बाबासो मोरे हा त्याला सहकार्य करायचा. बाबासोचा व्यवसाय शेती व जनावरांचा गोठा असून दोघांनाही मोठ्या प्रमाणात कर्जाचा डोंगर असल्याने आर्थिक चणचण व झालेले मोठे कर्ज होते.
या निराशेतून त्यांनी आज दुपारी एकच्या सुमारास पारगाव येथील डोंगरामध्ये एका झाडाला दोघांनीही टू व्हीलरचा आधार घेऊन दोरीच्या साह्याने झाडाच्या एकाच फांदीला एकाच दोरीने दोघांनीही गळफास घेऊन आपले जीवन संपवले.
विनायक याच्या मागे आई, पत्नी, मुलगा व मुलगी असून बाबासो मोरे याचे पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. या दोघांचे शव पारगाव ग्रामीण रुग्णालयांमध्ये शवविच्छेदन करून वितहानी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात जवानांनी आले. अधिक तपास भैरव तळेकर णण्याचे यांच्या मार्गदर्शनाखाली जावेद बागीच्या रोटीवाले रणवीर जाधव करीत आहेत.