Thursday, July 31, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरात मंडलिक पार्कात घरफोडी; १४ लाखांचा ऐवज लंपास!

कोल्हापुरात मंडलिक पार्कात घरफोडी; १४ लाखांचा ऐवज लंपास!

कोल्हापूर शहरातील राजारामपुरी तेराव्या गल्लीत असणाऱ्या मंडलिक पार्क येथे अज्ञात चोरट्याने बंद घराचा दरवाजा उचकटून १४ लाखांच्या सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरून नेली आहे.

याप्रकरणी पुष्कर प्रदीप सोनार (वय ३८ रा. श्री बंगला, बी वन मंडलिक पार्क, राजारामपुरी तेरावी गल्ली, कोल्हापूर) यांनी अज्ञात चोरट्या विरोधात राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान चोरट्यांनी घरातील साहित्य सगळे विस्कटून टाकला आहे. तिजोरीतील तीन लाख 50 हजार रुपयांच्या रोख रक्कम दोन लाख 40 हजार रुपयांच्या 60 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या पाटल्या एक लाख साठ हजार रुपये किमतीचे 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे तीन पदरी हार दोन लाख रुपये यांचे 50 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र साठ हजार रुपयांचे पंधरा ग्रॅम वजनाचे सोन्याचा नेकलेस चाळीस हजार रुपये किमतीचे सोन्याची कर्णफुले आणि अंगठ्या असा एकूण चौदा लाखांचा मुद्देमाल चोरून नेल्याचं फिर्यादीन पोलीस ठाण्यात सांगितल आहे. दरम्यान या प्रकरणी अधिक तपास राजारामपुरी पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -