Monday, February 26, 2024
Homeआरोग्यविषयककोविशील्ड लस घेतल्यावर किती काळ राहतात अँटीबॉडीज? जाणून घ्या...

कोविशील्ड लस घेतल्यावर किती काळ राहतात अँटीबॉडीज? जाणून घ्या…


देशात कोरोनाने थैमान घातलं होतं. दुसऱ्या लाटेचा अनेकांना फटका बसला. कोरोनाचा धोका टाळण्यासाठी देशात लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. लसीकरण सुरू असल्याने आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळतोय. पण नव्या व्हेरिएंटमुळे चिंता अजून कायम आहे. अशातच कोविशील्ड लसीबद्दल एक चांगली बातमी समोर आली आहे.
कोरोना लसीकरणात सर्वाधिक वापर कोविशील्ड लसीचा केला जातोय. सीरम इन्स्टिट्युटने तयार केलेली कोविशील्डची लस देशभरात कोट्यवधी लोकांनी घेतली आहे. दरम्यान कोविशील्डचे दोन डोस घेतल्यानंतर अँटिबॉडीज किती काळ शरीरात राहतात, हे तपासण्यासाठी बंगळुरूतील श्री जयदेव इन्स्टिट्यूट ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर सायन्सेस अँड रिसर्चने एक अभ्यास केला.
या अभ्यासातून एक अतिशय दिलासादायक गोष्ट समोर आलीये. कोविशील्डचे दोन्ही डोस घेतल्यावर 6 महिन्यांनंतरही 99 टक्के व्यक्तींच्या शरीरात अँटीबॉडीज टिकून असल्याची माहिती सर्वेक्षणातून पुढे आली.
या अभ्यासामध्ये लसीकरण पूर्ण झालेल्या 250 आरोग्य कर्मचाऱ्यांच्या शरीरातील अँटीबॉडीज तपासण्यासाठी सर्वेक्षणात केलं असल्याची माहिती जयदेवचे संचालक डॉ. सी. एन. मंजुनाथ यांनी दिलीये.
डॉ. मंजुनाथ म्हणाले, “आम्ही 250 जणांच्या शरीरातील अँटीबॉडीज तपासून पाहिल्या गेल्या. दोन्ही डोस घेऊन 6 महिने पूर्ण झाल्यावर 99 टक्के व्यक्तींच्या शरीरात अँटीबॉडीज कायम असल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली. त्यामुळे सध्याच्या काळात बूस्टर डोसची गरज नाही असं आपण म्हणू शकतो.”
या अभ्यासात सहभागी झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना फेब्रुवारी महिन्यात कोविशील्डचा दुसरा डोस देण्यात आला होता. एप्रिलमध्ये या सर्वांचं सर्वेक्षण करण्यात आलं. त्यावेळी 79 टक्के व्यक्तींच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्तीने पॉझिटीव्ह प्रतिसाद दिला. तर बाकी 21 टक्के व्यक्तींच्या शरीरातील रोगप्रतिकारशक्तीने निगेटीव्ह प्रतिसाद दिला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -