Friday, December 27, 2024
Homenewsधक्कादायक... दारुसाठी पत्नीला रॉकेल टाकून पेटवलं; पतीला अटक

धक्कादायक… दारुसाठी पत्नीला रॉकेल टाकून पेटवलं; पतीला अटक


दारू पिण्यासाठी पत्नीनं पैसे देण्यास नकार दिला. पत्नीनं नकार दिल्यामुळं राग अनावर झालेल्या पतीनं तिच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जिवंत जाळून ठार मारलं. या धक्कादायक प्रकारामुळे आसपासच्या परिसरात खळबळ माजली आहे. ही घटना भिवंडीतील शांतीनगर परिसरात घडली असून याप्रकरणी शांतीनगर पोलीस ठाण्यात आरोपी पती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी पतीला अटक केली आहे. फिरोज शेख असं अटक केलेल्या पतीचं नाव आहे. तर रुखसाना असं होरपळून मृत्यू झालेल्या पत्नीचं नाव आहे.


कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना दिवसागणिक वाढत आहे. अशातच पोलीस प्रशासनाकडूनही कौटुंबिक हिंसाचाराविरोधात जनजागृती करण्यात येत आहे. अशातच भिवंडीत घडलेला हा प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये कलमाची वाढ झाल्याचं जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या नोंदीवरून दिसून येत आहे. असाच एका कौटुंबिक हिंसाचाराचा प्रकार भिवंडीतील शांतीनगर परिसरात राहणाऱ्या कुटुंबात घडला आहे.


आरोपी फिरोज रुखसाना यांचा विवाह 18 वर्षांपूर्वी झाला होता. तेव्हापासून तो पत्नीसह राहतो. काही महिन्यांपासून त्याला दारूचं व्यसन जडलं होतं. त्यातच आरोपी फिरोज यानं आपल्या पत्नीकडे दारू पिण्यासाठी पैशांची मागणी केली होती. मात्र त्यावेळी पत्नीनं त्याला पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर संतापलेल्या फिरोज यानं पत्नीला मारहाण करण्यास सुरुवात केली. काही काळानं या दोघांमधील वाद विकोपाला गेला. रान अनावर झालेल्या फिरोजनं पत्नीच्या अंगावर रॉकेल ओतलं आणि तिला पेटवून ठार मारण्याचा प्रयत्न केला.


दरम्यान, पत्नी रुकसानानं तत्काळ अंगावरील आग विझविण्याचा प्रयत्न करीत तिथून पळ काढला. मात्र या घटनेत रुकसाना होरपळली असून ती गंभीर जखमी झाली. तिला इतर नातेवाईकांच्या मदतीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. मात्र उपचारादरम्यान त्याच दिवशी तिचा मृत्यू झाला. घटना घडली त्याच दिवशी रात्री आरोपी पतीला अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा अधिक तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -