यावेळी तिने घातलेला सिल्व्हर ड्रेस चांगलाच लक्षवेधी ठरत होता. या ड्रेसवरील दिशाचे अनेक फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताहेत.
दिशाचा हा मेटॅलिक सिल्व्हर स्लिप ड्रेस सध्या सोसशल मीडियावर चांगलाच चर्चेचा विषय ठरत आहे. यावर दिशाने केलेली अप्रतिम हेअर स्टाईल आणि घातलेले मॅचिंग हिल्स तिचा बोल्डनेस आणखी वाढवत आहे. मुंबईत आयोजित आयकॉन अवॉर्ड्सच्या रेड कार्पेटवर दिशाने अक्षरशः आग लावली. जेव्हा तिची या कार्यक्रमामध्ये एंट्री झाली तेव्हा सर्वांच्या नजारा तिच्यावरच असल्याचे दिसून आले
समोर आलेल्या फोटोंमध्ये दिशा अतिशय आकर्षक स्टाईलमध्ये पोज देताना दिसत आहे. लो मेकअप आणि किलर स्माईलमध्ये दिशाचे अनेक फोटो सध्या व्हायरल होताहेत. अनेकांनी दिशाच्या या फोटोजवर हार्ट इमोजी पोस्ट केले आहेत. तर काहींनी तिला तिच्या अनोख्या पोजेसमुळे ट्रोल देखील केलं आहे. ‘पाठ तुटेल’ अशी कमेंट एका युजरने केली आहे तर दुसऱ्या एकाने ‘लूक लाईक बाबा इलायची’ असं म्हंटल आहे.
दिशा याआधी ‘एक व्हिलन रिटर्न्स’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात तिच्यासोबत जॉन अब्राहम, तारा सुतारिया आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत होते. तर दिशा लवकरच योद्धा चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सिद्धार्थ मल्होत्रा देखील झळकणार आहे. याशिवाय दिशा पटनी लवकरच साऊथच्या ‘सूर्या 42’ चित्रपटात देखील काम करणार आहे.