Monday, July 28, 2025
Homeकोल्हापूरKolhapur News : फक्त दोन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या उच्चशिक्षित जोडप्याचा आत्महत्येचा...

Kolhapur News : फक्त दोन महिन्यांपूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या उच्चशिक्षित जोडप्याचा आत्महत्येचा प्रयत्न; कोल्हापुरातील प्रकार

अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह होऊन खटके उडून वाद होऊ लागल्याने कुटुंबीय सुद्धा भेदरून गेले आहे. दरम्यान, दोघांनाही उपाचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अवघ्या दोन महिन्यांपूर्वी उच्चशिक्षित असलेल्या आणि प्रेमविवाह करून नव्या आयुष्याला सुरुवात केलेल्या जोडप्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापुरातील गोकुळ शिरगावमध्ये घडला. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी विवाह होऊन खटके उडून वाद होऊ लागल्याने कुटुंबीयसुद्धा भेदरून गेले आहे. दरम्यान, दोघांनाही उपाचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार राहुल पाटील या 24 वर्षीय तरुणाचा 22 वर्षीय वैष्णवीशी दोन महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला. दोघांमध्ये कौटुंबिक कारणातून वाद सुरू आहे. राहुलची पत्नी पुण्यातील आहे. दोघेही उच्चशिक्षित असून राहुल नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. अवघ्या दोन महिन्यांमध्येच त्यांच्या वादावादी सुरु झाली आहे. दोघांनीच एकमेकांना वाचवले
घरी कोणीही नसताना घरात दोघांमध्ये शनिवारी (15 एप्रिल) किरकोळ वाद झाले. त्यामुळे याच वादातून राहुलने प्रथम फॅनला साडीने गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, पती राहुलने गळफास घेतल्याचे दिसताच पत्नी वैष्णवीने फास काढून घेत वाचवले. यानंतर वैष्णवीने सुद्धा तोच प्रकार करताना साडीने गळफास घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, राहुलने तिचा फास सोडवला. दोघांचा हा आत्महत्येचा प्रकार शेजाऱ्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने धाव घेत सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल केले. उच्चशिक्षित आणि एकमेकांना ओळखून प्रेमविवाह केलेल्या जोडप्याने दोन महिन्यांमध्ये असा प्रकार केल्याने कुटुंबीय हादरून गेले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -