Saturday, September 21, 2024
Homeकोल्हापूरड्रीम 11 वर कोल्हापूरच्या पोरानं जिंकले 1 कोटी, पण खात्यामध्ये आले इतकेच...

ड्रीम 11 वर कोल्हापूरच्या पोरानं जिंकले 1 कोटी, पण खात्यामध्ये आले इतकेच पैसे !

IPL सुरू झाले की ड्रीम 11 सारखे अनेक गेम आपण खेळत असतो. यामध्ये मागच्या काही दिवसांत अनेकांना कोट्यावधी रुपये जिकल्यांच्या आपण बातम्या ऐकल्या आहेत. परंतु तुम्हाला मिळालेले 1 किंवा 2 कोटी रुपये मिळतात ते सगळे पैसे तुमच्या खात्यात येतात का? याबाबत आपण जाणून घेऊ.

मागच्या तीन महिन्यांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील सातवीत शिकणारा एक मुलगा अवघ्या काही तासात कोट्यधीश झाला होता. भारत विरुद्ध न्यूझीलंड क्रिकेट सामन्यात ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन खेळात सहभागी झाला होता.
त्याने या ॲपवर तयार केलेल्या टीमने त्याला कोट्यधीश बनवले असल्याचा दावा करण्यात आला. परंतु त्याच्या खात्यात एक कोटी ऐवजी 70 लाख आले.

एका ऑनलाईन अॅप्लीकेशनमध्ये क्रिकेट सामना सुरू असताना व्हर्चुअल टीम तयार करून त्यावर आधी काही पैसे लावले जातात. यानंतर सामना सुरू असताना व्हर्चुअल टीम मधील खेळाडूचे पॉइंट्स हे प्रत्यक्ष सुरू असलेल्या सामन्यातील खेळाडूने केलेल्या प्रदर्शनावर मिळत असतात.

कोल्हापूर जिल्ह्यातील मुरगूड येथील सक्षम बाजीराव कुंभार या इयत्ता सातवीत आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात त्याने तब्बल एक कोटी जिंकले. त्यापैकी 30 टक्के कराची रक्कम वजा होऊन 70 लाख रुपये कमावले असल्याचा दावा सक्षमकडून करण्यात आला आहे. शिवाय काल रात्री त्याच्या अकाउंटवर जिंकलेली रक्कम ही जमा झाली असल्याचे फोटोत दिसत आहे.

तयार केलेल्या टीमने सर्वाधिक पॉईंट घेत रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास त्याने ऑनलाईन एक कोटी रूपये जिंकले असल्याचं म्हटलं असून 30 टक्के कर कमी होऊन 70 लाख रुपये जमा झाले. यानंतर ही रक्कम त्याच्या अकाउंटवर देखील जमा झाली. समजा तुम्ही 2 कोटी जिंकला तर तुमच्या खात्यात 1 कोटी 40 लाख रुपये जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान लॉटरी, क्रिप्टो करन्सी, ऑनलाईन गेमवर 30 टक्के कर लावला जातो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -