चंदगड तालुक्यातील किणी येथे भरारी पथकाने केलेल्या कारवाई मध्ये सुमारे ४ लाख रकमेचे साडे तेरा मेट्रीक टन बोगस खत जप्त केले. या संबंधित दोन्ही कंपन्या व प्रियांका अँग्रो सर्व्हिसेस, किणीचे चालक आल्पी करुदाद लोबो यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती सोमवारी देण्यात आली.
किणी येथील प्रियांका अँग्रो सर्व्हिसेस या खतविक्री केंद्रामध्ये क्रॉप्स फर्टिलायझर प्रा. लिमिटेड,मेहसाना, गुजरात कंपनीच्या व एसएच ॲग्रो इंडस्ट्रिज, अहमदाबाद, गुजरात या कंपनीची विद्राव्य खतांचे नमुने गुणनियंत्रण विभागीय भरारी पथक प्रमुख बंडा कुंभार यांनी विश्लेषणासाठी काढले होते. त्यामध्ये नत्र, स्फुरद , पालाश यांचे प्रमाण अत्यंत नगन्य आले.
तसेच या दोन्ही कंपन्यांनी राज्य शासनाचा खतविक्री परवाना न घेता विक्री केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे दोन्ही कंपनी व खत विक्रेता यांनी खत नियंत्रण आदेश व आत्यावश्यक वस्तू अधिनियम मधील तरतुदींचा भंग केल्याने खत निरीक्षक कुंभार यांनी चंदगड पोलीसांत फिर्याद दिली. या पथकास कोल्हापूरचे सहसंचालक बसवराज बिराजदार, अधिक्षक कृषि अधिकारी उमेश पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
कोल्हापूर जिल्ह्यात बोगस खत जप्त; उत्पादक, विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -