Tuesday, February 24, 2026
Homeक्रीडादिल्लीचा पहिला विजय!

दिल्लीचा पहिला विजय!

इंडियन प्रीमियर लीगच्या १६ व्या मोसमातील २८ वा सामना आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात खेळला गेला. दोन्ही संघांमधील हा सामना दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्स संघाचा चार गडी राखून पराभव करत या मोसमातील पहिला विजय नोंदवला.

दिल्लीने आजच्या संघात चांगले बदल केले आणि त्याचा फायदा त्यांना झाला. इशांत शर्मा संघात आल्याने गोलंदाजीला चांगली धार मिळाली आणि त्यांनी केकेआरचा डाव फक्त १२७ धावांत गुंडाळला. या आव्हानाचा पाठलाग करताना दिल्लीचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने अर्धशतक झळकावले आणि दिल्लीच्या पहिल्या विजयात सिंहाचा वाटा उचलला. दिल्लीने चार विकेट्स राखत हा सामना अखेरच्या षटकात जिंकला.

केकेआरचे १२८ धावांचे आव्हान माफक वाटत होते. पण तरीही या आव्हानाचा पाठलाग करत असताना दिल्लीला पृथ्वी शॉ याच्या रुपात पहिला धक्का बसला. पृथ्वीला यावेळी १३ धावा करता आल्या. पृथ्वीनंतर मिचेल मार्शही दोन धावांवर बाद झाला. हे दोघेही बाद झाले असले तरी कर्णधार व सलामीवीर डेव्हिड वॉर्नर हा पाय रोवून खेळपट्टीवर उभा होता. त्यामुळे दिल्लीचा संघ विजय मिळवेल, अशी चाहत्यांना आशा होती. डेव्हिड वॉर्नरने यावेळी दमदार अर्धशतक झळकावले खरे, पण तो मोक्याच्या क्षणी बाद झाला. वॉर्नरने यावेळी ४१ चेंडूंत ११ चौकारांच्या जोरावर ५७ धावा केल्या.

दिल्लीच्या संघाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यांच्या गोलंदाजांनी तो कसा योग्य आहे हे दाखवून दिले. आजच्या सामन्यात दिल्लीच्या संघाने इशात शर्माला संघात स्थान दिले होते, त्यामुळे त्यांच्या गोलंदाजीला अधिक धार आली होती. त्याचबरोबर सामना सुरु होण्यापूर्वी पाऊस पडला होता आणि त्याचाही फायदा यावेळी दिल्लीच्या संघाला झाला. दिल्लीने सुरुवातीपासून केके आरच्या संघाला धक्के द्यायला सुरुवात केली. एनरिच नॉर्किया, इशांत शर्मा, मुकेश कुमार, कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी यावेळी तिखट मारा केला आणि त्यामुळेच केकेआरच्या धावसंख्येला वेसण घातले गेले.

आरकडून सलामीवीर जेसन रॉयने दमदार फलंदाजी करताना सर्वाधिक ४३ धावा केल्या. त्यानंतर धडाकेबाज फलंदाज आंद्रे रसेलने अखेरच्या षटकात तीन षटकार लगावले आणि त्यामुळेच केकेआरच्या संघाला यावेळी १२७ धावा तरी करता आल्या. रसेलने यावेळी नाबाद ३८ धावांची खेळी साकारली. दिल्लीला यापूर्वी पाचही सामन्यांमध्ये एकही विजय मिळवता आला नव्हता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -