दोन्ही गटाकडून केलेल्या आरोपांनी जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कारखान्यासाठी रविवारी 23 एप्रिलला मतदान होणार असून मतमोजणी मंगळवारी 25 एप्रिलला होईल. गेल्या 15 दिवसांपासून आरोप प्रत्यारोपांच्या फैरीने तळ गाठलेल्या कसबा बावडा येथील श्री छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या आज (21 एप्रिल) प्रचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. आज संध्याकाळी 10 वाजता प्रचार थांबणार आहे. त्यामुळे आता पडद्यामागून हालचालींना वेग येणार आहे. दोन्ही गटाकडून केलेल्या आरोपांनी जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कारखान्यासाठी रविवारी 23 एप्रिलला मतदान होणार असून मतमोजणी मंगळवारी 25 एप्रिलला होईल. जिल्ह्यातील साडेसहा तालुक्यातील कारखान्याचे कार्यक्षेत्र असलेल्या 112 गावांमध्ये सभा, मेळावा या माध्यमातून प्रचार करण्यात आला. सोशल मीडियाचाही दोन्ही गटाने तितक्याच ताकदीने वापर केला आहे.
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -