Tuesday, July 29, 2025
Homeक्रीडामुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी आमनेसामने, प्रतिष्ठेच्या सामन्यात विजय कुणाचा?

मुंबई इंडियन्स विरुद्ध आरसीबी आमनेसामने, प्रतिष्ठेच्या सामन्यात विजय कुणाचा?

आयपीएल 16 व्या मोसमात मंगळवारी 9 मे रोजी 54 व्या सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या सामन्यात आयपीएलमधील 2 कट्टर प्रतिस्पर्धी आमनेसामने भिडणार आहेत. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात ही कडवी झुंज होणार आहे. रायव्हलरी वीक सुरु झाल्याने दोन्ही संघांसाठी प्लेऑफच्या दृष्टीने हा सामना महत्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही संघांचा या सामन्यात विजय मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे या दोन्ही संघांमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. आरसीबी आणि मुंबईचा हा या हंगामातील दुसरा सामना असणार आहे. आरसीबीने मुंबईवर 2 एप्रिल रोजी झालेल्या सामन्यात 8 विकेट्सने विजय मिळवला होता. त्यामुळे मुंबईचा या सामन्यात विजय मिळवून मागील पराभवाचा वचपा घेण्याचा प्रयत्न असणार आहे. या सामन्याबाबत आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मुंबई विरुद्ध आरसीबी सामना कधी आणि कुठे?
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात 9 मे रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये सामना खेळवण्यात येणार आहे.

मुंबई विरुद्ध आरसीबी सामन्याचं आयोजन कुठे?
मुंबई विरुद्ध आरसीबी यांच्यातील हा महामुकाबला मुंबईतील वानखेडे स्टेडियममध्ये खेळवला जाणार आहे.

सामन्याला किती वाजता सुरुवात?
मुंबई विरुद्ध आरसीबी सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. तर 7 वाजता टॉस होणार आहे.

लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहता येणार?
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यातील सामन्याचं लाईव्ह स्ट्रीमिंग स्टार स्पोर्ट्स नेटवर्क पाहता येईल.

डिजीटल स्ट्रीमिंग कुठे बघता येईल?
क्रिकेट चाहत्यांना जिओ अॅपद्वारे मोबाईल आणि लॅपटॉपवर लाईव्ह मॅच पाहता येईल. विशेष म्हणजे क्रिकेट शौकीनांना 12 भाषांमध्ये कॉमेंट्री ऐकता येणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -