प्रत्येकालाच काही ना काही आपल्या मनामध्ये इच्छाही असते. तसेच अनेक प्रकारच्या अडचणींनी देखील आपण खूपच त्रसलेलं असतो. जेणेकरून आपल्या अडचणी या दूर व्हाव्यात आणि आपल्याला देखील सुखी जीवन जगता यावे तर यासाठी अनेक प्रकारचे उपवास व्रत हे करीतच असतो. त्याचप्रमाने अनेक मंत्रांचा जप देखील करीत असतो. तर आज मी तुम्हाला स्वामींची एक विशेष सेवा सांगणार आहे आणि या सेवेमध्ये तुम्हाला एका मंत्राचा जप करायचा आहे. यामुळे तुमच्या सर्व अडचणी दूर होतील.
त्याप्रमाणे तुमच्या ज्या काही मनातील इच्छा असतील त्या देखील पूर्ण होणार आहेत. आपल्यापैकी बरेच जण हे स्वामींचे सेवेकरी आहेत म्हणजे अनेक मठांमध्ये, केंद्रामध्ये जाऊन आपण स्वामींचे सेवा करीत असतो. तसेच स्वामींच्या मंत्रांचा जप देखील करीत असतो. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामींचे वाक्य भक्तांच्या कायम मनामध्ये असतेच. त्यामुळे भक्त हे स्वामींच्या सीवेमध्ये लिन होऊन जातात.
तर आजची जी स्वामींची सेवा आहे ते आपल्या घरातील कोणत्याही व्यक्तीने केली तरी चालते. म्हणजेच घरातील स्त्री असो, पुरुष असो किंवा आपली मुले असो यांनी कोणीही सेवा केली तरीही चालते. या सेवेचा फरक तुम्हाला नक्कीच जाणवणार आहे. आपल्याला काही ना काही अडीअडचणी असतात म्हणजेच आर्थिक बाबतीत असू दे किंवा अनेक प्रकारचे घरांमध्ये भांडणे होत असतील, सुख शांती नांदत नसेल किंवा खूप दिवसांपासून मनात असलेली इच्छा ही देखील तुम्हाला पूर्ण व्हावी असे वाटत असेल तरी ही स्वामींची बुधवारची विशेष सेवा आवश्य तुम्ही करायचे आहे.
तर ही सेवा म्हणजेच या मंत्राचा जप तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी करू शकता म्हणजेच जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही सकाळी म्हणू शकता किंवा तुम्ही संध्याकाळी देखील या मंत्राचा जप 108 वेळा करू शकता. म्हणजे एक माळ तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. हा खूपच चमत्कारी प्रभावशील असा मंत्र आहे. तर आपल्याला संध्याकाळी देवघरासमोर स्वामींच्या मूर्ती समोर फोटो समोर बसायचे आहे.
दिवा अगरबत्ती लावून घ्यायची आहे आणि स्वामींच्या मूर्ती समोर हात जोडून आपल्या ज्या काही अडचणी असतील तसेच ज्या काही इच्छा असतील त्या स्वामींना बोलायचे आहेत आणि नंतर या मंत्राचा माळीने तुम्हाला जप करायचा आहे. म्हणजेच एक माळ तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र काहीसा असा आहे,
ओम अमोघतेजानंदाय नमः
तर हा चमत्कारिक मंत्र तुम्ही एक माळ याचा जप करायचा आहे. नंतर एक माळ या मंत्राचा जप झाल्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप देखील एक माळ करायचा आहे. तर अशा पद्धतीने मंत्र जप झाल्यानंतर तुम्हाला मनोभावे, श्रद्धेने स्वामींना नमस्कार करायचा आहे. हा मंत्र जप करीत असताना कोणत्याही प्रकारचे विचार आपल्या मनामध्ये येणार नाहीत याची पूर्णतः काळजी घ्यायची आहे.
अगदी मनोभावे, श्रद्धेने, हळुवारपणे तुम्हाला या मंत्राचा जप करायचा आहे. या चमत्कारिक मंत्राच्या जपामुळे तुमच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. संकटे दूर होतील आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील. तर अशी ही बुधवारची विशेष स्वामी समर्थ सेवा तुम्ही देखील अवश्य करून पहा. शंभर टक्के तुम्हाला नक्कीच अनुभव मिळेल.
मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.