Tuesday, April 30, 2024
Homeअध्यात्मघरामध्ये लावा स्वामींचा 'असा' फोटो साक्षात स्वामी विराजमान होतील!

घरामध्ये लावा स्वामींचा ‘असा’ फोटो साक्षात स्वामी विराजमान होतील!

मित्रांनो आपल्यापैकी बरेच जण हे स्वामी महाराजांचे सेवेकरी आहेत. ते अगदी मनोभावे, श्रद्धेने स्वामी महाराजांची सेवा तसेच अनेक मंत्राचा जप हे करीतच असतात. बऱ्याच केंद्रांमध्ये जाऊन ते मंत्रांचा जप तसेच स्वामींची सेवा करण्यात मग्न राहतात. जेणेकरून स्वामी महाराज हे आपल्यावर प्रसन्न होतील. आपल्या जीवनातील सर्व अडीअडचणी दूर करतील अशी प्रत्येक भक्ताला विश्वास हा असतोच. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य नेहमीच भक्तांच्या मनी रुजलेले आहे.

तर तुम्ही आपल्या घरामध्ये जर स्वामी महाराजांचा फोटो आणणार असाल तर नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायची आहे म्हणजेच कोणत्या प्रकारचा फोटो घेतल्याने स्वामी महाराज आपल्या घरामध्ये विराजमान होतील याविषयी सविस्तर जाणून घेऊयात. तर स्वामी महाराजांचे वेगळ्या प्रकारचे फोटो आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळतात. तर तुम्ही कधीही स्वामी महाराजांचा फोटो खरेदी करताना बसलेल्या स्वामी महाराजांचा फोटो खरेदी करायचा आहे.

कधीही उभ्या स्थितीत असलेल्या स्वामींचा फोटो अजिबात खरेदी करायचा नाही. तसेच त्या फोटोमध्ये कोणत्याही प्रकारचे प्राणी नसावेत म्हणजे सिंह, वाघ असे हिंस्र प्राणी अजिबात नसावेत. जर फोटोमध्ये कुत्रे असतील तर तुम्ही तो फोटो खरेदी करू शकता. कारण स्वामी महाराज हे दत्ताचे अवतार आहेत. त्यामुळे तुम्ही कुत्रा त्या फोटोमध्ये असतील तर असा फोटो खरेदी करू शकता.

तसेच तुम्ही फोटो खरेदी करीत असताना एक टक स्वामींच्या फोटोकडे पाहायचे आहे आणि त्यामुळे तुम्हाला एक वेगळाच अनुभव येईल सकारात्मक ऊर्जा तुमच्यामध्ये संचारेल तर तो फोटो तुम्ही अवश्य खरेदी करायचा आहे. ज्या फोटोकडे पाहून तुम्हाला प्रसन्न वाटेल तोच फोटो तुम्ही खरेदी करून आपल्या घरी आणायचा आहे. घरी आणल्यानंतर तुम्ही तो फोटो आपल्या घरामध्ये लावायचा आहे.

परंतु बरेच जण हे एखादा खिळा ठोकून त्या खिळाला तो फोटो अडकवतात. परंतु तसे न करता तुम्ही स्वामींच्या फोटो खाली एखादी लाकडी फळी किंवा काचेचा तुकडा तुम्ही ठेवायचा आहे आणि त्यावर स्वामी महाराजांचा फोटो ठेवायचा आहे. कधीही खिळाला लटकवून स्वामी महाराजांचा फोटो अजिबात लावायचा नाही. तर अशा प्रकारे तुम्ही देखील स्वामी महाराजांचा फोटो अवश्य खरेदी करून आणा. जेणेकरून स्वामी महाराज आपल्या घरामध्ये विराजमान होतील.

मित्रांनो वरील माहिती विविध स्त्रोतांच्या आधारे एकत्रित करण्यात आली आहे. याचा कोणीही अंधश्रद्धेशी संबंध जोडू नये ही विनंती. अशाच प्रकारची माहिती मिळवण्यासाठी आमचे पेज आताच लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -