Thursday, July 31, 2025
Homeक्रीडाराजस्थान की केकेआर कोणावर येणार बाहेर होण्याची नामुष्की?

राजस्थान की केकेआर कोणावर येणार बाहेर होण्याची नामुष्की?

आयपीएल 2023 मध्ये गुरुवारी (11 मे) कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असा सामना खेळला जाईल. कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर होत असलेल्या या सामन्याला लक्षणीय महत्त्व प्राप्त झाले आहे.दोन्ही संघांसाठी या सामन्यात विजय अनिवार्य असेल. या सामन्यात पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर होऊ शकतो.

कोलकाता नाईट रायडर्स या स्पर्धेतील कामगिरी खराब राहिली होती. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात त्यांना विजय मिळवता आले नव्हते. मात्र, मागील चार सामन्यात त्यांनी तीन विजय संपादन केले आहेत. दुसरीकडे राजस्थानच्या कामगिरीत कमालीची दुर्दशा दिसून आली. मागील सहापैकी पाच सामन्यात त्यांनी पराभव स्वीकारला आहे. सध्या दोन्ही संघांचे 11 सामन्यांमध्ये प्रत्येकी 10 गुण असून, केवळ सरस धावगतीच्या जोरावर राजस्थान पाचव्या क्रमांकावर काबीज आहे. या सामन्यात पराभूत होणारा संघ त्यानंतर केवळ 14 गुणांपर्यंत पोहोचू शकतो. हे गुण प्ले ऑफमध्ये जाण्यासाठी पुरेसे ठरत नाहीत.

फलंदाजीमध्ये केकेआरची भिस्त कर्णधार नितिश राणा, रिंकू सिंग, जेसन रॉय व आंद्रे रसेल यांच्यावर असेल. तर, गोलंदाजीत फिरकीपटू वरूण चक्रवर्ती व सुयश शर्मा हे संघाची धुरा वाहतील. सातत्याच्या पराभवामुळे खचलेल्या राजस्थानला पुन्हा एकदा जोस बटलर, यशस्वी जयस्वाल व कर्णधार संजू सॅमसन यांच्याकडून अपेक्षा असणार आहे. गोलंदाजीत रविचंद्रन अश्विन, चहल व बोल्ट कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी 7.30 वाजता सुरू होईल.

केकेआर संभाव्य प्लेइंग इलेव्हन-

रहमानउल्ला गुरबाज (यष्टीरक्षक), जेसन रॉय, व्यंकटेश अय्यर, नितीश राणा(कर्णधार), रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नरीन, शार्दुल ठाकूर, वैभव अरोरा, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

राजस्थान रॉयल्स संभाव्य प्लेईंग इलेव्हन-

यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार), देवदत्त पडिक्कल, शिमरन हेटमायर, ध्रुव जुरेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, ऍडम झम्पा, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -