Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानमोदी सरकार देतंय २३९ रुपयांचे फ्री mobile recharge?

मोदी सरकार देतंय २३९ रुपयांचे फ्री mobile recharge?

पंतप्रधान नरेंद्र मोदी 28 दिवसांसाठी भारतातील सर्व मोबाईल वापरणाऱ्या देशवासियांना 239 रुपयांचे मोफत रिचार्ज (recharge) देत असल्याचा एक मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल मेसेजमध्ये पुढे असे म्हटले आहे की मोदी सरकार 2024 च्या निवडणुकीपूर्वी मोबाईल वापरणाऱ्या भारतीयांना फ्री रिचार्ज देत आहे जेणेकरून अधिकाधिक लोकांनी भाजप सरकारला मतदान करावे.

सदर पोस्ट मध्ये नमूद केलेल्या मॅसेजनुसार ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी एका विशेष लिंकवर स्वतःची नोंदणी करावी लागेल. त्या लिंकद्वारे जे जोडले जातील त्याच लोकांना ह्या योजनेचा लाभ (mobile recharge) घेता येईल. सदर बनावट मेसेजचा खोटेपणा सिद्ध करत पीआयबी फॅक्ट चेकने ह्या पोस्टमध्ये केलेला दावा खोटा असल्याचे म्हटले आहे. त्यात म्हटले आहे की भारत सरकार कुठली ही मोफत रिचार्ज योजना चालवत नाही. देशातील जनतेची फसवणूक करण्याच्या उद्देशाने हा मेसेज पसरवला गेला असल्याचे पीआयबीने पुढे म्हटले आहे.

तुम्हाला असा कोणताही संशयास्पद संदेश आढळल्यास, तुम्ही नेहमी त्याची सत्यता तपासू शकता आणि व्हायरल संदेश खरा आहे की खोटी बातमी आहे हे तपासू शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in वर मेसेज करावा लागेल. वैकल्पिकरित्या तुम्ही तथ्य तपासणीसाठी WhatsApp +918799711259 देखील करू शकता. तुम्ही तुमचा संदेश pibfactcheck@gmail.com

वर देखील पाठवू शकता. तथ्य तपासणी माहिती https://pib.gov.in वर देखील उपलब्ध आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -