कडक उन्हामुळे उन्हाळ्यात गृहिणी पापड, लोणची, कुरडया असे पदार्थ बनवत असतात. एकदा तयार केलेले हे पदार्थ बराच काळ टिकून राहतात.
उन्हाळ्यात सुट्टी असल्याने घरातील अन्य सदस्यही त्यांना या कामामध्ये मदत करत असतात. या काळात इमारती, घरांच्या गच्चीवर पापड, कुरडई उन्हामध्ये ठेवल्याचे पाहायला मिळते. आपल्याकडे प्रामुख्याने तांदळाच्या कुरडया बनवल्या जातात. तांदळा व्यतिरिक्त गव्हापासूनही हा पदार्थ तयार करता येतो. आज आम्ही तुम्हाला गव्हाच्या कुरडया (summer recipe) कशा बनवायच्या याची माहिती देणार आहोत.
साहित्य:
१ किलो गहू
पाणी
तेल
चवीनुसार मीठ
कृती:
गहू धुवून ३ दिवस भिजत घाला. या तीन दिवसांमध्ये रोज त्यातील पाणी बदला.
पाण्यात ठेवल्याने गहू तिसऱ्या दिवसापर्यंत मऊ होतील. (ते मऊ झाले आहे की नाही हे बोटांनी तपासून घ्या.)
मऊ झालेले गहू पुन्हा धुवून स्वच्छ करा. पुढे १/२ कप ब्लेंडरच्या भांड्यात घ्या आणि त्यात १ कप पाणी घाला.
ब्लेंडरचा वापर करुन ते मिसळा. ते मिश्रण एका पातेल्यामध्ये काढा. त्या पुन्हा एकदा पाणी टाका.
मिश्रण व्यवस्थितपणे मिसळून त्यातून निघणारा अनावश्यक भाग काढून टाका.
एका भांड्यावर सूती कापड लावून ते मिश्रण गाळून घ्या. त्यात परत पाणी मिसळून ते पुन्हा गाळून घ्या.
२-३ वेळी ही कृती केल्यावर उरलेले मिश्रण रात्रभर भांड्यामध्ये झाकून ठेवा.(summer recipe)
दुसऱ्या दिवशी मिश्रण पुन्हा एकदा गाळून घ्या. उरलेल्या भागात क्वचित गरम पाणी टाका.
त्यानंतर ते पॅनमध्ये थोडसं तेल टाकून मध्यम आचेवर राहू द्या. पाणी, मीठ घालून उकळवा.
पाणी उकळल्यावर त्यात गव्हाचे मिश्रण टाका. सतत ढवळत रहा. व्यवस्थितपणे घट्ट होईपर्यंत शिजवा.
५ मिनिटांसाठी झाकण लावून ते मिश्रण शिजू द्या. त्यानंतर साच्याला तेल लावून त्यात मिश्रण टाका.(summer recipe)
पुढे कुरडया तयार करुन १-२ दिवस कडक उन्हात ठेवा. मग त्या हवाबंद डब्यात ठेवून द्या.
जेव्हा कधी कुरडया खायची इच्छा होईल, तेव्हा डब्यातून काढून तेलामध्ये तळा.
४-५ दिवसांमध्ये बनवा वर्षभर पुरतील इतक्या गव्हाच्या कुरवडया ; साहित्य आणि कृती
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -