ट्रोलिंगला न जुमानता उर्फी बऱ्याचवेळा सार्वजनिक ठिकाणी अत्यंत बोल्ड कपडे घातलेली दिसते. अभिनेत्री उर्फी जावेद(Urfi Javed) रोज तिच्या अतरंगी चित्रविचित्र कपड्यांमुळे चर्चेत असते. एका कार्यक्रमातील तिचा ड्रेस पाहून पुन्हा नेटकऱ्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
यावेळी पुन्हा नेटकरी तिच्यावर भडकले आहेत. एवढेच नाही तर पापाराझींनाही तिचे व्हिडीओ (Video)किंवा फोटो(Photo) न काढण्याची विनंती केली आहे. या कार्यक्रमात उर्फीने जाळीचा ट्रान्सपरंट ड्रेस घातला होता. उर्फी अशा वस्तूंपासून ड्रेस बनवते, त्याची कल्पनासुद्धा कोणीही करू शकत नाही.
![](https://tajibatmi.com/wp-content/uploads/2023/05/images-2023-05-17T132810.033.jpeg)
उर्फीने जाळीचा ट्रान्सपरंट ड्रेस घातल्याने तिला आता ट्रोल केले जात आहे. ‘हिच्या मेंदूचा कोणीतरी उपचार करा, असे एकाने तर पापाराझींनी ‘हे सर्व कव्हर करणं सोडले पाहिजे, असे दुसऱ्या एकाने प्रतिक्रिया दिली आहे. ‘हिला नरकातही जागा मिळणार नाही, अशीही टीका नेटकऱ्यांनी केली आहे.
![](https://tajibatmi.com/wp-content/uploads/2023/05/images-2023-05-17T132820.792.jpeg)