अंधश्रद्धेला( Superstition) छेद देऊन ग्रहणाशी डोळे भिडवणाऱ्या ‘सावित्रीच्या लेकी’ने गोंडस अशा सदृढ कन्यारत्नाला (Baby girl)जन्म दिलामुलीचे नुकतेच राजनंदिनी(Rajnandini) असे नामकरण करण्यात आले आहे.
अंधश्रद्धेत अडकलेल्या समाजाला बाहेर काढण्यासाठी नवेखेड येथील ‘सावित्रीच्या लेकी’ने परंपरेशी विद्रोह करून सूर्यग्रहणाशी डोळे भिडवून अंधश्रद्धेला छेद दिला होता. याबाबत सविस्तर वृत्त असे की, नवेखेड येथील पूजा ऋषिराज जाधव, ऋषिराज मोहन जाधव (Sanjay jadhav)या उच्चशिक्षित दाम्पत्याने पुढाकार घेऊन समाजातील ग्रहण न पाहण्याच्या अनिष्ट प्रथेला मूठमाती दिली होती आणि समाजासमोर नवा आदर्श निर्माण केला.ग्रहणकाळात पूजा जाधव यांनी सौर चष्म्यातून थेट ग्रहणात काळवंडलेल्या सूर्याशी डोळे भिडवले होते. विशेष म्हणजे त्यांनी सर्व कुटुंबीयांचे सहकार्य मिळाले. पूजा जाधव यांच्या आजीसासू शांताबाई जाधव, सासू माजी सरपंच छाया जाधव, सासरे मोहन जाधव, दीर पंकज जाधव, जाऊ प्रियांका जाधव यांची साथ मिळाली. ग्रहणकाळात जे करायचे नाही ते करून दाखवत, पूजा यांनी आदर्श निर्माण केला.उपक्रम राबवण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व शंभूराजे प्रतिष्ठान यांनी पुढाकार घेतला. पूजा-ऋषिराजसह कुटुंबीयांनी नातलगांच्या उपस्थितीत नुकत्याच जन्मलेल्या कन्यारत्नाचे राजनंदिनी असे दिमाखदार सोहळ्यात
Sangli: अंधश्रद्धांना छेद देण्यासाठी पूजाच धाडस सूर्यग्रहण पाहिलं अन दिला गोंडस बाळाला जन्म
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -