अभिनेता सलमान खान ( Salman Khan) कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो.. कधी सिनेमा तर कधी भाईजानचं खासगी आयुष्य चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असतं.. आता देखील अभिनेता एका खास कारणामुळे चर्चेत आला आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक महिला सलमान खान याला लग्नाची मागणी घालताना दिसत आहे. महिलेने लग्नाची मागणी घातल्यानंतर सलमान खाने देखील तिला उत्तर दिलं आहे.. सध्या सर्वत्र व्हायरल व्हिडीओची ( Viral Video) चर्चा रंगत आहे. शिवाय व्हिडीओवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव देखील करत आहेत. महत्त्वाचं म्हणजे सलमान खान याला लग्नाची मागणी घालणारी महिला थेट परदेशातून आली आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर तुफान व्हायरल होणारा व्हिडीओ IIFA पुरस्कार सोहळ्यातील आहे.. सलमान खान याला पाहिल्यानंतर अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचलेली असते. आता देखील पुरस्कार सोहळ्यात सलमान खान याला पाहिल्यानंतर चाहत्यांची एकच गर्दी जमली.. जेथे एका महिला चाहतीची चर्चा तुफान रंगत आहे…
IIFA पुरस्कार सोहळ्यात आलेली महिला हॉलिवूडची सोशल मीडिया कन्टेंट क्रिएटर आहे. पुरस्कार सोहळ्यात पोहोचल्यानंतर सलमान खान याला पाहताच महिलेने अभिनेत्याला लग्नासाठी मागणी घातली.. महिला सलमान खान याला म्हणाली, ‘हॉलिवूडमधून मी फक्त तुला भेटायला आली आहे. तुला पहिल्यांदा पाहिल्यानंतर मी प्रेमात पडली..’
पुढे सलमान ( Salman Khan) त्याच्या खास अंदाजात म्हणतो, ‘तू शाहरुख खान याच्याबद्दल बोलत आहेस?’ यावर महिला म्हणाली, ‘नाही.. मी सलमान खान याच्याबद्दल बोलत आहे.. सलमान खान तू माझ्यासोबत लग्न करशील?’ महिलेच्या या प्रश्नावर सलमान देखील हसत नकार देतो.. सलमान खान याने दिलेलं उत्तर सध्या तुफान चर्चेत आहे..
लग्नासाठी महिलेला नकार देत अभिनेता म्हणतो, ‘लग्न करण्याचे माझे दिवस गेले आहेत.. तू मला २० वर्षांपू्र्वी भेटायला हवं होतं..’ सध्या सर्वत्र सलमान खान ( Salman Khan) याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.. शिवाय भाईजानला लग्नाची मागणी घालणाऱ्या महिलेची देखील सर्वत्र चर्चा रंगत आहे.
अभिनेता सलमान खान कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्याला जीवे मारण्याची धमकी मिळत आहे, तर दुसरीकडे अभिनेत्याच्या ‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमाला मिळालेलं अपयश… अशा अनेक कारणांमुळे अभिनेता चर्चेत असतो. शिवाय मुलाखतींमध्ये अभिनेता त्याच्या खासगी आयु्ष्याबद्दल देखील मोठे खुलासे करत असतो..
‘किसी का भाई किसी की जान’ सिनेमानंतर अभिनेता लवकरच ‘टायगर ३’ सिनेमाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे.. सिनेमात अभिनेता शाहरुख खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे.. चाहते देखील भाईजान याच्या ‘टायगर ३’ सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत.