Friday, February 7, 2025
Homeब्रेकिंगआठवड्याच्या पहिल्याच दिवशी 'या' राज्यात पेट्रोल महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी ‘या’ राज्यात पेट्रोल महागले, जाणून घ्या तुमच्या शहरातील दर



गेल्या वर्षी फेब्रुवारी 2022 मध्ये सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ-उतार होत आहेत. रशिया-युक्रेन युद्धाच्या परिणामी विक्रमी पातळीवर पोहलेले कच्चे तेल आता प्रति बॅरल $75 पर्यंत घसरले आहे. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कच्च्या तेलात (crude oil) पुन्हा एकदा चढ-उतार पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत पुन्हा एकदा प्रति बॅरल 75 डॉलरच्या पुढे गेली आहे. WTI क्रूड $ 1.41 ने वाढून प्रति बॅरल $ 73.15 वर व्यापार करत आहे. त्याच वेळी, ब्रेंट क्रूड $ 1.48 च्या वाढीसह प्रति बॅरल $ 77.61 वर विकले जात आहे. देशातील तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे नवीनतम दर जाहीर केले आहेत. जाणून घ्या पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर…

महाराष्ट्रात पेट्रोलची सरासरी किंमत 106.89 रुपये आहे. काल, 4 जून 2023 पासून महाराष्ट्रात किमतीत कोणताही बदल नोंदवला गेला नाही. तर डिझेलची खरेदी सरासरी 93.48 रुपये दराने होत आहे. तर दुसरीकडे आज बहुतांश राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. पंजाबमध्ये पेट्रोल 50 पैशांनी तर डिझेल 48 पैशांनी महागलं आहे. छत्तीसगडमध्ये पेट्रोल 48 पैशांनी तर डिझेल 47 पैशांनी महागलं आहे. उत्तर प्रदेशात पेट्रोल-डिझेल 33 पैशांनी वाढले आहे. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये पेट्रोल 42 पैसे आणि डिझेल 39 पैशांनी महागले आहे. राजस्थान, जम्मू-काश्मीर, मध्य प्रदेश आणि गुजरातमध्येही इंधन महाग झाले आहे. दुसरीकडे, झारखंडमध्ये पेट्रोल आणि डिझेल 55 पैशांनी स्वस्त झाले आहे. हरियाणामध्ये किरकोळ दिलासा मिळाला आहे.

अहमदनगर 106.62 93.13
अकोला 106.14 92.69
अमरावती 107.23 93.74
औरंगाबाद 106.75 93.24
भंडारा 106.69 93.22
बीड 107.46 93.94
बुलढाणा 107.36 93.87
चंद्रपूर 106.10 92.94
धुळे 106.57 92.54
गडचिरोली 106.82 93.36
गोंदिया 107.84 94.32
बृहन्मुंबई 106.31 94.27
हिंगोली 107.93 94.41
जळगाव 106.89 93.38
जालना 108.30 94.73
कोल्हापूर 106.47 93.01
लातूर 107.19 93.69
मुंबई शहर 106.31 94.27
नागपूर 106.04 92.59
नांदेड 108.32 94.78
नंदुरबार 107.40 93.88
नाशिक 105.89 92.42
उस्मानाबाद 106.75 93.26
पालघर 105.97 92.46
परभणी 108.79 95.21
पुणे 106.17 92.68
रायगड 106.09 92.58
रत्नागिरी 107.43 93.87
सांगली 106.05 92.60
सातारा 106.78 93.30
सिंधुदुर्ग 107.86 94.34
सोलापूर 106.22 92.76
ठाणे 105.97 92.47
वर्धा 107.01 93.52
वाशिम 107.07 93.59
यवतमाळ 107.29 93.80

दररोज सकाळी 6 वाजता नवीन दर जाहीर
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी 6 वाजता बदलतात आणि नवीन दर जारी केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत मूळ किंमतीपेक्षा जवळपास दुप्पट होते. यामुळेच पेट्रोल आणि डिझेल इतके महागात खरेदी करावे लागत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -