Friday, February 7, 2025
Homeसांगलीआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जयसिंगपूरात निवासी वसतीगृह होणार; राजू शेट्टींची घोषणा

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जयसिंगपूरात निवासी वसतीगृह होणार; राजू शेट्टींची घोषणा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांसाठी जयसिंगपूर येथे निवासी वसतीगृह सुरू करणार असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिली. नांगरट साहित्य संमेलनात राजू शेट्टी यांनी घोषणा केली.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले की, वर्षानुवर्षे तोट्याच्या शेतीमुळे काढलेलं कर्ज शेतकऱ्यांना फेडता येत नाही. आणि बुडवण्याची हिम्मत नाही त्यामुळे आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, अशी अवस्था बळीराजीची झाली आहे.आत्महत्याग्रस्त मुलांच्या शिक्षणासाठी निवासी वसतीगृह काढण्याचा निर्णय घेतला आहे. देशात संसदेने शिक्षणाचा हक्क हा कायदा प्रत्येकाला दिला. मात्र हे शिक्षण करणं परवडत का? याचा विचार केला नाही, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, आज कोल्हापूर जिल्ह्यात 9 शाळा अशा आहेत ज्यामध्ये शून्य शिक्षकी आहेत. जर सर्वसामान्य मुलांची अवस्था अशी असेल तर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या मुलाची अवस्था कशी होईल. विधवा माऊलीला संसाराची गाढा सांभाळता सांभाळता मुलांचं शिक्षण पूर्ण करण शक्य नाही. म्हणूनच निवासी वसतीगृह सुरु करणार आहोत. जयसिंगपूर हे शैक्षणिक हब असल्यामुळे हे ठिकाण निवडलं आहे. याठिकाणी मुलांना चांगल्या शिक्षणसंस्थेत शिक्षण घेता यईल असेही ते म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -