Monday, March 4, 2024
Homenewsगुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो तर महाराष्ट्राचा का नाही? ; संजय राऊत

गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो तर महाराष्ट्राचा का नाही? ; संजय राऊत


शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पुढच्या मुख्यमंत्रीपदासंदर्भातील भाकीत वर्तवलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीत केवळ शासकीय चर्चा झाली. राजकीय चर्चा झाली नाही, असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज स्पष्ट केलं. यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्राच्या 2024 च्या मुख्यमंत्रिपदाबाबत भाकीत वर्तवलं.
ठाकरे सरकारकचं कुणी काही वाकडं करू शकत नाही. 2024 नंतरही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री राहतील. अशा शब्दांत त्यांनी भाजपलाही आव्हान दिलं. पुणे पालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवण्याची वेळ आलीय, असंही ते म्हणाले. दुसरीकडे संजय राऊत यांनी अजित पवारांना इशारा दिला. मुख्यमंत्र्यांचे अजित पवार ऐकतात, त्यांना सांगू आमचे ही ऐका, नाही तर गडबड होईल, असा इशारा राऊतांनी दिला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये शिवसेनेच्या कार्यक्रमात राऊत बोलत होते.

‘सव्वा रुपया जाहीरपणे द्यावा लागणार राजकीय असेल किंवा कोर्टातला असेल राजकारणातही मी दोन वर्षापूर्वी त्यांना हरवलं. राज्यात शिवसेनेचं सरकार आलंय मी आणि उद्धव ठाकरेंनी त्याच वेळी ठरवलं होतं की भाजपला धडा शिकवायचा. आमची किंमत काय ते भविष्यात महाराष्ट्र आणि देश पाहिल. आज आमचे मुख्यमंत्री दिल्लीत बसले होते जेवायला तुम्ही कुठे आहात.’
”महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जो असतो हा देशाचा सर्वात महत्त्वाचा नेता मानला जातो. गुजरातचा मुख्यमंत्री पंतप्रधान होऊ शकतो तर महाराष्ट्राचा का नाही? उद्धव ठाकरे दिल्ली पाहायला गेलेत असं मला विचारल्यावर मी आज एकाला सांगितलं. भविष्यात आम्हाला तिकडे जाऊन राज्य करायचं आहे. उद्धव ठाकरे हे देशात पहिल्या 5 मध्ये मुख्यमंत्री म्हणून निवडून आले.”
”आजचा विरोधीपक्ष यांना काय जमतंय मुख्यमंत्री म्हणून असं म्हणायचे. दोन महिन्यात जाणार, मग तीन महिने मग एक वर्ष मग आता उद्या परवा तीन दिवस आता त्यांचं झालं बारावं आणि तेरावं. आम्ही आहोत आम्ही हटणार नाही.” संजय राऊत यांनी भाजपवर मिश्कीलपणे टीका करत पुढचाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच असतील असं भाकीत केलं आहे.

”आजचा विरोधीपक्ष यांना काय जमतंय मुख्यमंत्री म्हणून असं म्हणायचे. दोन महिन्यात जाणार, मग तीन महिने मग एक वर्ष मग आता उद्या परवा तीन दिवस आता त्यांचं झालं बारावं आणि तेरावं”

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -