Thursday, October 3, 2024
Homeआरोग्यविषयकदातदुखीमुळे आहात त्रस्त, डॉक्टरकडे जाऊन होत नाही काही फायदा, तर करा हे...

दातदुखीमुळे आहात त्रस्त, डॉक्टरकडे जाऊन होत नाही काही फायदा, तर करा हे सोपे उपाय!



हल्ली लहान असो किंवा मोठे सर्वच जण दात दुखीच्या त्रासामुळे (Teeth Issue) त्रस्त आहेत. बऱ्याच लोकांचे दात खूप संवेदनशील (Sensitive Teeth) असतात. ज्यामुळे त्यांना थंड किंवा गरम (Cold and Hot) काहीही खाल्ले तरी दातांना झिणझिण्या येतात. त्यामुळे त्यांना खूपच त्रास होतो. याला डेंटल हाइपर सेंसिटिव्हिटी (Dental hyper sensitivity ) असे म्हणतात. यामध्ये तुम्ही काहीही खाल्ले तर तुमच्या दातांना तात्काळ झिणझिण्या येतात. यासाठी बरेच जण अनेक प्रकारचे औषधोपच्चार करतात. सतत डॉक्टरकडे (Doctor) जाऊन देखील त्यांची ही समस्या दूर होत नाही. अशामध्ये आज आम्ही तुम्हाला काही घरगुती उपायांबद्दल (home remedies) सांगणार आहोत त्यामुळे तुमच्या दात दुखीच्या समस्या दूर होतील
हायपर सेंसिटिव्हिटीची कारणं –
– हार्ड टूथब्रशचा (hard toothbrush) वापर करणे
– पायोरिया रोग
– तंबाखू आणि गुटख्याचे (tobacco and gutkha) सेवन करणे
– जास्त आमली पदार्थ खाणे
– दातांचा काही भाग तुटणे
– हिरड्या सैल होणे
– दातांमध्ये कीड लागणे
दात सेंसिटिव्ह झाल्यानंतर काय खावे –
दात सेंसिटिव्ह झाल्यानंतर तुम्ही फायबरयुक्त भाज्या, फळे (Vegetables, fruits) खाल्ली पाहिजे. यामध्ये सफरचंद, केळी, सलाड, दूध, ओटमील, काजू, बदाम, अक्रोड, गाजर, बीट, ब्रोकली, बटाटा, डेअरी उत्पादने (Apples, bananas, salads, milk, oatmeal, cashews, almonds, walnuts, carrots, beets, broccoli, potatoes, dairy products) यांचा समावेश होतो. या सर्व गोष्टी तुम्ही खाल्ल्या पाहिजे.
दात सेंसिटिव्ह झाल्यानंतर काय खाऊ नये –
लिंबू, कैरी, चिंच (Lemon, Carrie, Chinch) इत्यादी आंबट गोष्टी तुम्ही खाणं टाळले पाहिजे. त्याचसोबत गोड पदार्थ यामध्ये कॅडबरी, चॉकलेट, आइस्क्रीम, कोल्ड ड्रिंक्स, सोडा (Cadbury, chocolate, ice cream, cold drinks, soda) इत्यादी गोष्टी गाणं आणि पिणं टाळलं पाहिजे.

सेंसिटिव्हिटी दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय करा –
मीठाच्या पाण्याने गुळणा करा –
सेंसिटिव्ह दातापासून सुटका करण्यासाठी रोज सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी कोमट पाण्यामध्ये दोन चमचे मीठ (Salt) मिसळून या पाण्याने (Water) गुळणा करा.
मोहरीचे तेल –
सेंसिटिव्ह दातापासून सुटका करण्यासाठी एक चमचा मोहरी (Mustard oil) किंवा एक चमचा नारळाच्या तेलात (Coconut oil) 1/2 चमचे सैंदव मीठ टाका. आपल्या दाताला लावून थोड्यावेळ मसाज करा आणि पाच मिनिटांनी दात धुवा.

कडूलिंबाचे दातून –
हार्ड टूथब्रशऐवजी तुम्ही सेंसिटिव्ह दाता स्वच्छ करण्यासाठी कडूलिंबाच्या दातूनचा वापर करा. यामुळे सेंसिटिव्हीटीपासून आराम मिळतो.
कच्चा कांदा –
कांद्याच्या (Onion) छोट्या तुकड्यांना आपल्या दुखत असलेल्य दातांवर पाच मिनिटं दाबून ठेवा. त्यानंतर हलक्या कोमट पाण्यामध्ये मीठ टाकून गुळण्या करा.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -