Saturday, July 27, 2024
Homeब्रेकिंगएकनाथ शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट, मृतदेहाच्या बॅगांची किंमत तब्बल इतकी दाखवली गेली?

एकनाथ शिंदे यांचा मोठा गौप्यस्फोट, मृतदेहाच्या बॅगांची किंमत तब्बल इतकी दाखवली गेली?

ताजी बातमी ऑनलाईन टीम

मुंबई महापालिकेच्या कथित कोविड घोटाळ्याप्रकरणी ईडीची चौकशी सुरु आहे. याप्रकरणी ईडीकडून धाडसत्र टाकलं जात आहे. अनेकांच्या चौकशा सुरु आहेत. असं असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोरोना काळात मृतदेहांच्या बॅगांची किंमत तब्बल किती रुपये दाखवल्या गेल्या याबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. यावेळी त्यांनी मृतांच्या टाळूवरचं लोणी खाणं हे चांगलं आहे का? असा सवालही केला. संबंधित कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीची चौकशी सुरु आहे. ईडीच याबाबत खुलासा करेल. पण राज्य सरकारने यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप केलेला नाही, असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

“ईडीकडून सुरु असलेल्या कथित कोविड घोटाळ्याच्या चौकशीवर मी बोलू इच्छित नाही. जे काही निघेल ते चौकशीतून समोर येईल. मी मगाशी म्हणालो आणि आताशी सांगतो, सूड भावनेने, आकाशापोटी किंवा राजकीय सूड बुद्धीने कुठलीही कारवाई केली जाणार नाही. यामध्ये परिवाराचा विषयच येत नाही. परिवार कुठून आला? राज्याचं आणि जनतेचं हित बघाना. कोविडची आज चौकशी लावलीय तर की कुणी लावली आहे? ईडीने लावली आहे. ईडी ही केंद्रीय तपास यंत्रणा आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

‘इकडे माणसं मरत होते तिकडे लोकं पैसे खात होते’
“कथित कोविड घोटाळा प्रकरणात कॅगचे ताशेरे आहेत. कोविड सारखा भयंकर आजार होता. इकडे माणसं मरत होते. तर दुसरीकडे लोकं पैसे खात होते. मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाणं हे चांगलं आहे? मृतदेहांच्या बॅगची किंमत तुम्ही 500 ते 600 रुपयांवरुन थेट 5 हजार ते 6 हजार लावत असाल, यापेक्षा दुसरं मोठं पाप काय असू शकेल?”, असा सवाल एकनाथ शिंदे यांनी केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -