Tuesday, May 21, 2024
Homeइचलकरंजीइचलकरंजी ; 'गोविंदराव ' मध्ये आर्मी भरतीबाबत मार्गदर्शन

इचलकरंजी ; ‘गोविंदराव ‘ मध्ये आर्मी भरतीबाबत मार्गदर्शन

ताजी बातमी ऑनलाईन टीम

इचलकरंजी येथील गोविंदराव हायस्कूल अॅन्ड ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता बारावीमध्ये शिकणान्या विद्यार्थी- विद्यार्थीनींना आर्मी भरती प्रक्रियेबाबत मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न झाली.

चरकी दादरी हरियाणा येथील आर्मी रिक्रुटमेंट ऑफिसर सुभेदार मेजर राजू हुद्दार यांनी यावेळी आर्मी भरती प्रक्रिया, अग्निवीर, महिला मिलेटरी पोलिस, एन.डी.ए. व एस. एस. बी. इ. बाबत प्रोजेक्टरच्या सहाय्याने माहिती दिली. सेवा कालावधीत तसेच निवृत्तीनंतर मिळणाऱ्या सोयी सुविधा, सवलती इ. बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.

युवक- युवतींना खाजगी नोकरी व सैन्यातील नोकरी यातील मुलभूत फरक स्पष्ट करून सांगितला आणि आर्मी भरतीसाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने विद्याथ्र्यांशी संवाद साधला. सदर उपक्रमावेळी गोविंदराव ज्युनि. कॉलेजचे उपप्राचार्य आर. जी. झपाटे, पर्यवेक्षक एस. एस. तेली, एस. एस. पाटील, एस. एस. माने व विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -